Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

ग्रामपंचायत गावातच उभारू शकणार कोरोना विलगिकरण कक्ष

गजानन सोनटक्के जळगाव जा – कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणाऱ्या ग्रामविकास मंत्रालयाने आता आणखी पुढचे पाऊल उचलले आहे .ग्रामविकास मंत्रालयाने ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून कोरोना रुग्णांसाठी कोरोना विलगिकरन कक्ष उभारण्याची परवानगी दिली आहे.

Isolation ward

या परवानगीमुळे कोरोनाचा धोकादायक प्रसार गावातच रोखणे आता शक्‍य होणार आहे. ग्रामपंचायतींना ग्रामपंचायतच्या क्षेत्रात कोरोना आयसोलेशन सेंटर उभारण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय 25 मे रोजी घेण्यात आला आहे. त्यासाठी सदरील ग्रामपंचायत पंधराव्या वित्त आयोगाच्या उपलब्ध निधीतून 25 % टक्के मर्यादेत खर्च करता येईल अवनधीत (अनटाईड) निधीतून किमान तीस वा त्यापेक्षा जास्त खाटांच्या कक्षासाठी ही मुभा राहणार आहे . जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशा प्रस्तावांना मान्यता देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.