सिदखेडराजा ( बुलडाणा ) : सिंदखेडराजा चे नगरसेवक नरहरी तायडे यांची तशी कुठली राजकीय पार्श्वभुमी नाही नगरसेवक होण्याअगोदर समाजसेवा आणि मदतीला धावणारा अशी ओळख असणारा सामान्य नागरिक . नगरसेवक झाल्यावरही त्यांनी आपले हे काम चालूच ठेवले याची प्रचिती आज परत एकदा आली .
सिंदखेडराजा चे नगरसेवक नरहरी तायडे यांनी स्वतः हा माणिक चौक येथे पाईपलाईन दुरुस्तीचे काम स्वतः उभं राहून करून घेत होते , यावेळी एक दिव्यांग व्यक्तीची मोटारसायकल त्या रोडवरून जात असताना ती गाडी निघत नसल्याने स्वतः हा नगरसेवक नरहरी तायडे यांनी तेथील माती काढली . रस्त्यावर माती असल्याने गाडी निघत नव्हती मग यांनी स्वतः फावडे हतात घेऊन माती बाजूला केली आणि त्या व्यक्तीस गाडी काढण्यास मदत केली व दिव्यांगांच्या मदतीला घावुन आले आहे . त्यांना रस्ता करून दिला व पाईपलाईन दुरुस्ती चे काम स्वतः उभे राहून करून घेतले . यानिमित्ताने एका नगरसेवकाचे मानुसकिचे दर्शन घडले व नगरसेवक खऱ्या अर्थाने जनसेवक ठरले .