Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जिजामाता नगर सिंदखेड राजा येथील अवैद्य धंदे बंद करा महिला सह नागरिकांची मागणी

jijamata nagar

सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी -जिजाऊ माहेरघर असलेल्या सिंदखेड राजा शहरांमधील जिजामाता नगर मध्ये अवैद्य धंद्यांना ऊत आला आहे अवैद्य धंदे गेल्या अनेक दिवसांपासून दारू मटका जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे तरुण पिढी देखील व्यसनाधीन झाली आहे जिजामाता नगरमधील अवैध धंदे बंद करावे यासाठी सिंदखेडराजा पोलीस स्टेशनमध्ये शेकडो सह्या सह ठाणेदारांना निवेदन दिले आहे सदर प्रकरणाची दखल न घेतल्यास महिला मूलबाळ नागरिक यांचा मोठा मोर्चा पोलीस स्टेशन वर काढण्यात येईल असा इशारा जिजामाता नगर मधील महिला सह नागरिकांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.