कालच्या तुलनेत संख्या घटली बुलढाणा तालुका २०० पार तर ५ रुग्ण दगावले .
१५ मे रोजी जिल्ह्यात कमी कोरोना पेशंट संख्या झाली कमी असे असले तरी बुलडाणा तालुक्यात कोरोना प्रकोप झाल्याचे चित्र आहे , याशिवाय शेगाव आणि मलकापूर दोन तालुक्यांनि शंभरी ओलांडल्याचे दिसून आले. पाच जण उपचारादरम्यान मृत्यू पावले .
काल १४ मी रोजी जिल्ह्यात १२०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले होते. त्यातुलनेत आज जिल्ह्यात ८७८ कोरोना बाधित निघाले. बुलडाणा तालुक्यात स्फोट झाल्यासारखी स्थिती असून, २४ तासांत तब्बल २१२ रुग्ण आलेत. याशिवाय शेगाव ११० मलकापूर, १३९ देऊळगाव राजा ८४ लोणार ७५, नांदुरा ७५ , मोताळा ५१, खामगाव ४१ , चिखली ३२, मेहकर २१, सिंदखेराजा ३४, संग्रामपूर व जळगाव जामोद प्रत्येकी ११ अशे रुग्ण आहेत. दुसरीकडे गत् 24 तासांत ५ रुग्ण दगावले आहेत. यात खामगावच्या सामान्य रुग्णालयात ३, बुलडाण्याच्या महिला रुग्णालय व शेगावच्या सामान्य रुग्णालयातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. एकूण बळींची संख्या ५०६ इतकी झाली आहे.