सिंदखेड राजा रवींद्र सुरुशे – सिंदखेड राजातालुक्यातील सवडद येथील १७ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला आहे . त्याच्या वडिलांनी या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांत तक्रार दिली आहे . विनायक परमेश्वर धोंडगे वय १७ वर्ष असे मुलाचे नाव आहे . त्याचा शेतात,गावात सर्वत्र शोध घेण्यात आला.मात्र तो मिळून आलेला नाही.त्याला कुणीतरी पळवून नेले असल्याचा संशय त्याचे वडील परमेश्वर धोंडगे यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे . पुढील तपास स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेर्डा पोलीस करीत आहे
Related Posts