२४ तासात गुन्हा उघड करून दोन आरोपींना अटक किनगाव राजा पोलिसांची कामगिरी
आरोपींना सहा दिवसाची पोलीस कोठडी
प्रतिनिधी सचिन मांटे.
सिंदखेड राजा – तालुक्यातील किनगाव राजा पोलिस स्टेशन अंतर्गत जवळका शिवारात दि ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान विकास सुभाष मंडपे वय ३३ वर्ष जिल्हा रत्नागिरी यांना कमी किंमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून सहा लाख ९० हजार माल व बॅग मधील कागदपत्रे घेऊन लुटून फरार झालेल्या आरोपींपैकी २ आरोपी ना काल दि १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पोलिसांनी सदर गुन्ह्यात अटक केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे
याबाबत हकीकत अशी की विकास सुभाष मंडपे वय ३३ वर्ष रा गीम्हवने गोसावीवाडी ता दापोली जिल्हा रत्नागिरी यांना व त्यांचे मित्रांना कमी किमती सोने देण्याचे आमिष दाखवून त्यांना सिंदखेड राजा येथे बोलावून घेऊन तेथून त्यांना ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान जवळका शिवारात नेले येथे सोने न देता विकास मंडपे व त्यांचे मित्रांना चाकूचा धाक दाखवून तसेच काठीने मारहाण करून त्यांच्याजवळील नगदी रोख सहा लाख रुपये तसेच गळ्यातील सोन्याची चेन व अंगठी दोन मोबाईल असा एकूण सहा लाख ९० हजार रुपयांचा माल व बॅग मधील कागदपत्रे घेऊन मुख्य आरोपी बालाजी किसन मोहिते रा सुकापूर जिल्हा हिंगोली अधिक सहा ते सात अनोळखी इसम पळून गेले होते अशी फिर्याद विकास सुभाष मंडपे यांनी किनगाव राजा पोलिस स्टेशन ला दिली त्यानुसार पोलिसांनी अप नं २७०/२०२१ कलम ३९५, ४२०भादवि नुसार गुन्हा दाखल केला होता त्या नुसार पोलिसांनी तपास चक्रे जोरात फिरवून गोपनीय माहिती च्या व तांत्रिक पुराव्याच्या आधारे यातील सतीश रोहीली पवार वय २६ वर्ष रोहीलि राघो पवार वय ६१ वर्षे रा आगेफळ ता सिंदखेड राजा यांना सदर गुन्ह्यात अटक केली पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर आरोपींना पकडण्यासाठी ठाणेदार युवराज रबडे जमादार अशोक चाटे पो कां गणेश लोंढे श्रावण डोंगरे सुभाष गीते राहुल डोंगरे यांनी अथक परिश्रम घेऊन सदर आरोपींना अटक केले सदर आरोपींना आज दि ११ नोव्हेंबर रोजी न्यायालयात उभे केले असता त्यांना दि १६ नोव्हेंबर सहा दिवसा पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर मुख्य आरोपी बालाजी किसन मोहिते रा सुकापुर जिल्हा हिंगोली सह इतर आरोपी अद्याप फरार आहेत त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले असून घटनेचा तपास ठाणेदार युवराज रबडे जमादार अशोक चाटे श्रावण डोंगरे सुभाष गीते हे करीत आहेत.