![](https://www.matrutirthalive.com/wp-content/uploads/2021/11/IMG-20211116-WA0047.jpg)
किनगावराजा दि.१४(प्रतिनिधी) रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेल्या नात्यास मायेची ओढ जास्त असते.अगदी पुराणकाळापासून ही परंपरा आपल्या समाजात चालत आलेली आहे. त्याचाच प्रत्यय दिनांक १२ नोव्हेंबर रोजी किनगावराजावासीयांना पाहावयास मिळाला.
मध्यंतरीच्या काळातील ५ वर्षाचा अपवाद वगळता गत ३० वर्षांपासून सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी किनगावराजा येथील फुलेनगर येथे रहिवासी असलेल्या एक छोटेश्या टपरीवजा दुकानात किराणा दुकान थाटून टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या नवाज पठाण या छोट्याशा कार्यकर्त्याच्या आईचे आलीमुनबी पठाणचे माहेर डॉ.शिंगणे यांच्या शेंदुर्जन गावाजवळील काटेपांग्री असल्याने व त्यांचे वडील सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे यांचे धडाडीचे कार्यकर्ते असल्याने आलीमुनबी ना.शिंगणे यांना छोटे भाऊ मानत असल्या कारणाने त्यांनी रक्षाबंधन सणाच्या दिवशी फोन करून राखी बांधण्याकरिता बोलावले होते.ना.शिंगणे यांनीही मतदार संघात आल्यानंतर रक्षाबंधनाकरिता नक्की घरी येणार असा शब्द दिला.राजकारणी व्यक्तीला दिलेला शब्द फिरवणे म्हणजे डाव्या हाताचा खेळ.परंतु ना.शिंगणे यांनी कोरोना काळात अतिव्यस्तता असल्या कारणामुळे रक्षाबंधन सणाच्या काळात येऊ न शकल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर कार्यकर्ता भेटीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात किनगावराजा येथे आले असता मेळावा संपल्यानंतर रात्रीचे तब्बल ११ वाजता आलीमुनबी पठाण यांच्या घरी जाऊन रक्षाबंधन करवून घेत आपला दिलेला शब्द पाळला.यावेळी त्यांच्यासमवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक विजयसिंह राजे,प्रा.मधुकर गव्हाड,सत्तार खान पठाण,रविंद्र निकम,प्रा.अविनाश राजे,संदीप देशमुख,शिवाजी राजे,आनंद राजे,अजय राजे यांची उपस्थिती होती.
इतक्या रात्री एवढ्या मोठ्या गाड्यांचा ताफा फुलेनगरसारख्या छोट्याश्या भागात आल्याने तेथील रहिवासीही चकित झाले होते.फेसबुक,व्हाट्सअपच्या काळात सद्यस्थितीतिल राजकारणी पंचतारांकित झालेले असतांनाही जातीधर्माच्या भिंतीपल्याड सर्वधर्म समभावाचे नाते मागील ३० वर्षांपासून जोपासून वाटचाल करणाऱ्या पालकमंत्री डॉ.शिंगणे यांच्या रक्षाबंधनाची खुमासदार चर्चा किनगावराजा परिसरात होत आहे.