Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

पीएम किसान साठीची ई केवायसी सरकारी यंत्रणेने युद्धपातळीवर निःशुल्क करून द्यावी- रा. कॉ. किसान सभा जिल्हाध्यक्ष राजीव जावळे

चिखली – पी.एम. किसान योजनेत शेतकरी बांधवांना जे 2000 रुपये केंद्र सरकार मार्फ़त डी.बी.टी. द्वारे देण्यात येतात, त्यासाठी सरकारने ई-के.वाय.सी करण्याची जाचक अट घातली आहे. तसेच जे शेतकरी बांधव हे ई-के.वाय.सी करणार नाहीत त्यांना सदर रक्कम दिल्या जाणार नाही असेही सांगितले जात आहे.


अजून बुलडाणा जिल्ह्यातील बऱ्याच शेतकरऱ्यांनी इ केवायसी केलेली नाही. सरकारने सदर सदर इ केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख ३० सप्टेंबर दिलेली आहे. या तारखेनंतर जर काही शेतकरी यापासून वंचित राहिले तर त्यांचे नुकसान होणार आहे.

जे शेतकरी शिक्षित आहेत वा ज्यांना ई-के.वाय.सी सहज करणे शक्य आहे अशा शेतक-यांनी ई-के.वाय.सी पुर्ण केलेली आहे. आजच्या तारखे पर्यंत चिखली तालुक्यातील जवळपास 11 हजारापेक्षा जस्त शेतकरी ई-के.वाय.सी करण्याचे बाकी आहेत. यापैकी बहुतेक शेतकरी हे वयस्कर, अशिक्षित किंवा दुर्लक्षित असण्याची शक्यता आहे. तेंव्हा आपण महसुल विभागा मार्फ़त ग्रामपंचायत कंप्युटर ऑपरेटर, शिपाई, सचिव, तलाठी यांच्या कडून बाकी राहिलेल्या शेतक-यांचे निशुल्क ई-के.वाय.सी करुन घ्यावी. जेणे करुन वयस्कर, अशिक्षित, दुर्लक्षीत, गरीब शेतकरी सदर योजने पासून वंचित राहणार नाही.


सरकार जर जनतेला एखादा लाभ देण्यासाठी जाचक अटी लादत असेल आणि समाजातील एखादा घटक जर त्याच्या पर्यंत सदर माहीती वेळेत न पोहचल्याने, तंत्रज्ञाना विषयीच्या अज्ञानाने, मजबुरीने अथवा अन्य कुठल्या कारणाने वंचित राहत असेल तर अशा व्यक्तीस मुख्य प्रवाहात आनण्याची नैतिक जबाबदारी ही प्रशासनाची अथवा सरकारचीच असते. त्यामुळे आपण सदर यंत्रणेस आवश्यक त्या सुचना करून विहीत वेळेत ई-के.वाय.सी निशुल्क पुर्ण करण्यास सांगावी.

असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जिल्हाध्यक्ष तथा माजी उपसभापती कृऊबास चिखली राजीव जावळे यांनी चिखली तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे यांना दिले आहे. यावर तहसीलदार डॉ येळे यांनी आम्ही महसूल विभाग पंचायत समिती व कृषी विभागातील विविध कर्मचाऱ्यांना ही केवायसी बाबत सूचना देत आहोत आणि वेळेत च्या आत सर्व शेतकरी बांधवांचे ईकेवायसी पूर्ण करण्यात येईल असा शब्द याप्रसंगी राजीव जावळे यांना दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.