Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

पिकावरील कीड व रोग व्यवस्थापनाबदल कृषीकन्येने केले मार्गदर्शन

किनगावराजा (सचिन मांटे) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न सुविदे फाउंडेशन अंतर्गत कृषी महाविद्यालय रिसोड येथील कृषीकन्या अक्ष्विनी मधुकर शेळके या विदयार्थीनीने कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत किनगाव राजा येथील शेतकऱ्यांना पिकावरील रोग व्यवस्थापनाबदल मार्गदर्शन केले.

सतत पावसाची रिमझम सुरु असल्याने वातावरणातील आर्द्रता वाढलेली आहे. या ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव जास्त वाढताना दिसतो अश्यावेळी योग ती लक्षणे दिसताच नियंत्रण कसे करावे या संदर्भात मार्गदर्शन केले मिरची वरील कोकडा ,कपाशी वरील अनुजीवी करपा, मावा, चक्रिभुंगा खोडमाशी मुंगावरील पिवळा विषाणु इ. विषाणुजन्य व बुरशीजन्य रोगावर रासायनिक नियंत्रणाबरोबरच पिकांच्या संरक्षणासाठी एकात्मिक जैविक नियंत्राणाचा अवलंब करावा असे आव्हान केले.

जैविक नियंत्रण ट्रायकोडर्मा २ ते २.५ किलो प्रतिएकरी २५० ३०० किलो सेंद्रिय खतामध्ये देऊन पिकावरील रोगाचे व्यवस्थापन कसे करता येईल या संदर्भात मार्गर्शन केले. यावेळी गावातील आदर्श शेतकरी गजानन कासतोडे,मधुकर शेळके,लक्ष्मण शेळके इ. शेतकरी उपस्थित होते. सदर प्रत्याशिकासाठी महाविद्यालयाचे समन्यवयक आर एस. डवरे कीटकशास्त्रज्ञ प्रा. डॉ. ए. एम अप्तुरकर कार्यक्रम समन्वयक रावे. प्रा. डी.डी. मसुडकर कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. ए. कंकाळ, प्रा. आर. वाय. सरनाईक, प्रा. हरणे (कीटकशास्त्र) व (वनस्पतीकृषीशास्त्र) प्रा. व्ही. एस. बोडखे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.