Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

किनगावराजा पोलीस स्टेशन नवनियुक्त ठाणेदार युवराज रबडे यांच्याकडुन राहेरी पुलावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीला ब्रेक

किनगावराजा(सचिन मांटे).किनगावराजा पोलीस स्टेशन नवनियुक्त ठाणेदार युवराज रबडे यांच्याकडुन राहेरी पुलावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीला ब्रेक लावण्यात आला आहे.जिल्ह्यात पोलीस प्रशासनामध्ये मागील आठवड्यात अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या किनगावराजाचे यापूर्वीचे ठाणेदार सोमनाथ पवार यांची बदली बुलढाणा येथे झाली.

त्यावर मेहकर येथे कार्यरत असलेले युवराज रबडे यांनी किनगावराजा पोलीस स्टेशन चा चार्ज घेतला.नागपूर-मुबंई ला जोडला जाणारा राहेरीचा पूल नावाने ओळख असलेला पूल दुरुस्ती साठी अवजड वाहणासाठी बंद करण्यात आला होता तरीपण या पुलावरून वाहतूक होती.अशातच वाहतूकिला आळा घालन्यासाठी ठाणेदार युवराज रबडे यांनी वाहतूकीवर कारवाई केली कारवाई करत असतांना ठाणेदार युवराज रबडे,(ट्रॅफिक) नाजीम चौधरी, सुधाकर गवई, राजू दराडे, समीर परसूवाले जाकिर पठाण हे उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.