Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

मामा भाच्यांसह धरणात डूबुन तिघांचा अंत..!!

*धानोरा गांवा वर शोककळा ……..!!
मामा भाच्यांसह धरणात डूबुन तिघांचा अंत..!!

गजानन सोनटक्के जळगाव जा

धानोरा महासिध्द:-जळगांव जामोद तालुक्यातील धानोरा लघु प्रकल्पात (हत्ती पाऊल धरणात) मामा व दोन भाच्यांचा धरणात डूबुन करून अंत झाल्याची घटना आज दि 18 मे रोजी सकाळी7 उघडकीस आली.

MAMA BHACHE


सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तीर्थ क्षेत्र धानोरा महासिध्द गावांवर शोककळा पसरली 17 मे रोजी दुपारी 3:30वाजेच्या दरम्यान पुणे येथे जॉब करणारा विनायक गाडगे वय 27 वर्षे सध्या लोकडाऊ मुळे धानोरा येथे घरी आला व्होता व त्याला सोबती त्यांचे काका चा मुलगा तेजस गाडगे वय 18 वर्ष व लग्न समारंभा करिता दाताळा ता मलकापूर वरून आपल्या बहिणीला घ्यायला धानोरा येथे आलेले त्यांचे मामा श्री नामदेव वानखडे वय 43 वर्षे हे तिघे जण धानोरा लघु प्रकल्प परिसरात फिरायला गेले सध्या उन्हाळा असल्याने ते पाण्यात पोहण्यासाठी गेले.


परंतु रात्री उशिरापर्यंत तिघे जण घरी नपरतल्याने नातेवाईकांनी शोध शोध सुरू केली सदर घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील यांनी पोलीस टेशनला दिली. धरणपरिसरात शोध सुरू असताना त्यांचे कपडे व मोबाईल फोन पाण्याचे काठावर आढळून आले तो पर्यंत रात्र झाल्यानें अंधारात सदर मृतकांचा शोध लागला नाही आज सकाळी पुन्हा शोध घेतला असता पाण्यामध्ये मूरतदेह तरंगताना निदर्शनास आले. पाण्यात पोहणार्या लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले
गावात सदर घटने बद्दल हळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.