Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

राशन बाबत तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांच्या समस्या सोडवणार : पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे

मेहकर, विष्णु आखरे पाटील – मेहकर पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी गजानन टेकाळे यांनी शेलगाव देशमुख येथे भेट दिली असता निरीक्षण अधिकारी गजानन टेकाळे यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संपतराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दिलीप आखरे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद गोरे यांच्या हस्ते करण्यात आला


मेहकर तालुक्यातील नागरिकांच्या राशनच्या समस्या बाबत चर्चा केली यावेळी उपस्थित समस्याग्रस्त राशन शिधापत्रिका धारक नागरिकांनी आपल्या समस्या अधिकाऱ्यासमोर मांडल्या मेहकर तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे व जास्तीत जास्त नागरिकांना रेशनकार्ड, धान्य वाटप इतर राशन संदर्भात सहकार्य करण्याचे आश्वासन मेहकर पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी गजानन टेकाळे यांनी उपस्थित‌ नागरिकांना दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपतराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दिलीप आखरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद गोरे सह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.