Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा च्या माध्यमातून एकाच वेळी राज्यभर तीनशेपेक्षा जास्त तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात लक्षणीय उपोषण करून काळ्या फिती व काळे मास लावून प्रशासनाचा निषेध करण्यात आला

OBC

नागपुर – महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा च्या माध्यमातून एकाच वेळी राज्यभर तीनशेपेक्षा जास्त तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात लक्षणीय उपोषण करून काळ्या फिती व काळे मास लावून सर्वप्रथम संत संताजी जगनाडे महाराज आणि घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करून प्रशासनाचा निषेध करून निवेदन देण्यात आले उमरेड शहरातसुद्धा ओबीसींच्या आरक्षणाकरिता एकदिवसीय तहसील कार्यालयासमोर उमरेड येथे लाक्षणीय उपोषण करण्यात आले प्रदेशाध्यक्ष मा. खा. रामदासजि तडस, महासचिव मा. डॉ. भूषणची कर्डिले, कोशाध्यक्ष गजानन शेलार, मा. मंत्री विजयजि वडेट्टीवार, विदर्भाचे ओबीसी नेते माजी मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भाचे प्रभारी बळवंतराव मोरघडे, युवा आघाडी अध्यक्ष मा. आ. संदीप क्षीरसागर, युवा आघाडी कार्याध्यक्ष अतुल वांदिले, युवा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष जगदीश वैद्य, नागपूर विभागीय अध्यक्ष प्रशांत ईखार यांच्या मार्गदर्शनाने उमरेड येथे लाक्षणिक उपोषण उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनाला तेली समाजासोबत इतर ओबीसी समाज बांधव सुद्धा उपस्थित होते अनेक ओबीसी संघटनांनी आजच्या लाक्षणिक उपोषणाला समर्थन दिले.

उपोषणाला अनेक मान्यवरांनी व ओबीसी समाजबांधवांनी भेटी दिल्या याप्रसंगी नगरपरिषद उमरेड येथील उपाध्यक्ष मा. गंगाधरराव फलके, माजी नगराध्यक्ष गंगाधरराव रेवतकर, माजी सचिव मा.गो. लेंढे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ मा. संजय मेश्राम साहेब, ओबीसी वक्ता मा. अशोकजि ठाकरे, मा. अरविंद शेंडे, जैबुन्निसा शेखताई, प्रदेश उपाध्यक्ष जगदीश वैद्य इत्यादी मान्यवरांनी ओबीसींवर होत असलेल्या अन्यायासंदर्भात सर्व पक्षांनी एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे अन्यथा येणार्या निवडणुकांत ओबीसी नक्कीच या नेत्यांना जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही केंद्र सरकार व राज्य सरकारने आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षण दिलेच पाहिजे आमच्या कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध नाही आमचा विरोध आहे शासकीय यंत्रणेला तरी केंद्र व राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाने मागितलेला इम्पिरियल डेटा तयार करून सुप्रीम कोर्टाला दिले पाहिजे आमचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात बाद झालेले आहे ते शक्यतो लवकर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून प्रशासनाने पूर्ववत ठेवायला पाहिजे व केंद्र शासनाने जातनिहाय जनगणना केलीच पाहिजे महाराष्ट्र प्रांतिक तैली महासभेच्या माध्यमातून आज हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले हे शांततेचे निवेदन होते भविष्यात आम्ही आमच्या ओबीसींच्या आरक्षणाकरिता सर्व ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे युवा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष जगदीश वैद्य यांनी उपोषणासंदर्भात सांगितले.

अशा अनेक मागण्यांचे निवेदन तयार करून मा. तहसीलदार कदम साहेब, उमरेड यांना देण्यात आले या प्रसंगी युवा आघाडी अध्यक्ष अमित लाडेकर, महिला आघाडी अध्यक्षा गीताताई आगासे, सचिव नंदिनी वासूरकर, नगरसेवक उमेश हटवार, नगरसेवक राजेश भेंडे, नगरसेवक मा. सुरेश चीचमलकर, नगरसेवक विशाल देशमुख, नगरसेविका रेणुका कामडी, सेवा आघाडी विभागीय संघटक प्रा. डॉ. प्रमोद लाखे, हरिश्चंद्र दहागाणे, शालीक चकोले, राजहंस देशमुख, विलास मुंडले, श्रावण गवळी, जितेंद्र गिरडकर, सुरजदादा इटनकर, युवा आघाडी सहसचिव संजयराव घुघुसकर, सुधाकर पडोळे, चेतन पडोले, कोषाध्यक्ष पोपेश्वर गिरडकर, संघटक रूपेश गिरडे, युवा आघाडी उपाध्यक्ष दत्तू जिभकाटे, रोशन मेहरकुरे, बाळू तेलरांधे, मंगेश गिरडकर, राजेश बाद्रे, उमेश वाघमारे, कोहिनूर वाघमारे, मंगेश मेंडुले,धनराज मंगरुळकर, येवले सर,वरसा गिरडे,नागेश भिवनकर, रवींद्र मिसाळ, राकेश नौकरकर, केतन रेवतकर, रुसी गवळी, हरिश्चंद्र झाडे, श्रीकांत ब्रह्मे, प्रफुल्ल बावनकर, प्रदीप वाघमारे, नरेंद्र वरघने,पवन सिंगने, महेश मरगडे, बंडू चुटे, लकी फटींग, देविदास जिभकाटे, मनीषा मुंगले, आगासे साहेब, सोनल बालपांडे, दुर्गा जिभकाटे, कुंदा झाडे, वर्षा वाघमारे, लता बानकर, हरिश्चंद्र गवळी, गणेश वासुरकर, सुरेखा गोल्हर, मनिषा येवले, वैशाली बाँदरे , दृश्यांत झाडे, दिनकर तायवाडे, अँकुश बेले, जयकुमार बोढाने, कैलास साठवणे, महेन्द्र तेलरांधे, महेंद्र जुनघरे, भूपेश गिरिपुंजे, प्रशांत ढोके, शिवशंकर दांडेकर, मनोहर रेवतकर, राजेंद्र वैद्य, अलका गिरडे, अरविंद हजारे, हर्षा वाघमारे, प्रकाश मोहड, गनपत हजारे, सुजाता उमाटे, सुनिल कामडि, मेघा चौधरी इत्यादी ओबीसी समाजबांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश वैद्य यांनी केले तर आभार नंदिनी वासूरकर यांनी मानले

Leave A Reply

Your email address will not be published.