गजानन सोनटक्के जळगाव जा – आज दि.2/7/2021ला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील रद्द केलेल्या ओबीसी समाजचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक इंपीरिकल डाटा सुप्रीम कोर्टात सादर करून ओबीसी आरक्षणाचा स्थगिती आदेश रद्द करावा व केंद्र/राज्य सरकार द्वारा ओबीसींची जातीनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षणाचा कायदा संमत करावा तसेच मंडल आयोग लागू करावा या करीता ,मा.तहसीलदार साहेब,तहसील कार्यालय जळगाव जामोद,जिल्हा बुलढाणा.यांना महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा,जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष श्री दिलीपभाऊ आकोटकार यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी सचिव श्यामभाऊ पांडव,कार्याध्यक्ष प्रकाशभाऊ खेडकर,विभाग सचिव रमेशराव आकोटकार,जिल्हाधयक्ष नंदकिशोरजी काथोटे,जि.प्र.प्रमुख अनिलभाऊ भगत,तेली पंच मंडळ अध्यक्ष गणेशराव जामोदे,जि.प्र.प्रमुख(युवा)गणेशभाऊ अरूडकार ,राजूभाऊ काथोटे,जिल्हा कार्याध्यक्ष संजयजी चोपडे,अमोलभाऊ चोपडे,शरदराव गोमासे,सुनीलभाऊ पाटील,प्रदीप भागवत,शंकरराव पातळे,बाळूभाऊ भलभले,सुनीलभाऊ धनभर,अनिलभाऊ धनभर,नितीनजी नवथळे,प्रफुल्लभाऊ कावरे,चंद्रकांतजी मंडवाले इ.पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते.वरील सर्व मान्यवरांच्या निवेदनावर सह्या आहेत….