पावसा अभावी शेतकरी चिंतातूर परिसरात दुबार पेरणीचे संकट

गजानन सोनटक्के जळगाव जा – निसर्गाच्या लहरीपणाचा व माणसाचा समतोल हा आता काही ठिकाणावर राहिला नाही असं दिसून येते पावसाळा लागून जवळपास एक महिना झाला या महिन्यांमध्ये फक्त तीन वेळा पाऊस आला तो मोजकाच पण सगळीकडे नाही मोजक्याच भागात या तीन वेळेस या पावसाने जळगाव जा परिसरातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या परंतु पावसाने पाठ फिरवल्याने परिसरात दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे या वर्षामध्ये कपाशी तिच्याकडे सर्वाधिक शेतकऱ्यांचा कल दिसून दिसून येतो त्यानंतर मका आणि सोयाबीन हीच पिके प्रामुख्याने घेतली जातात सोयाबीन पिकाचे उत्पादन कमी होत असल्याने भावाचा ताळमेळ जमत नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन कडे दुर्लक्ष केले आज रोजी ठीक आहे पण शेतातील आल्यावर भाव पाडल्या जातात नंतर महत्त्वाचे म्हणजे सोयाबीन हे आंतरपीक असून मुख्य म्हणजे दूर आहे आता ज्वारी उडीद तीळ हे आता मोजकेच पिके राहिले ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या शेतकऱ्याची जमिनीच्या ओलोसाच्या भरोशावर पिके आली पण त्यांना आता वन्यप्राणी त्रास द्यायला लागली पाऊस नसल्याने जर पाऊस असता तर पिकाची वाढ झाली असती हरीण या सारखे वन्य प्राणी खातात नाहीतर करून टाकतात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाच जुलै नंतर पाऊस दाखवला आहे तोपर्यंत ही कोवळी पिके उन्हाच्या कडाक्याने जळून जाण्याची शक्यता आहे या देशात उद्योगधंदे आहेत मात्र कोणाला राजा म्हटलं जात नाही पण शेतकऱ्याला बळीराजा असे संबोधले जात होते त्याच बळीराजाचा आता पावसामुळे बळी जाण्याची शक्यता दिसून येत आहे शेतकऱ्याला बळीराजा का म्हटलं जातं प्रत्येक व्यावसायिक आपल्या उत्पादनाची किंमत स्वतः ठरवतात पण या देशांमध्ये शेतकरी हा असा एक व्यवसायिक आहे त्याच्या मालाची किंमत तो स्वतः ठरवू शकत नाही इतकी उदारता ज्याच्या अंगी आहे म्हणून तर त्याला बळीराजा म्हटलं जातं लाखो करोडो रुपयांची बियाणे खते तो माती टाकतो तो फक्त निसर्गाच्या भरवशावर आहे आणि हाच निसर्ग त्यांच्याच जीवावर आज उठला आहे अशा वेळी त्याला साथ हवी फक्त निसर्गाची शेवटी म्हणावं लागेल (अशी कशी हे हवा फिरली अन भाऊ माई पराटी जयली.…….