Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघा बहीण भावाला पिता पुत्रांनी केली गंभीर मारहाण

सिंदखेड राजा मातृतीर्थ लाइव्ह वार्ता – भाचीला केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्यादोघा बहीण भावाला पिता पुत्रांनी गंभीर मारहाण केल्याची घटना साखरखेरडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वर्दडी येथे 1 जुलै रोजी घडली, आरोपी पिता-पुत्रांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता 5 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे वर्दडीयेथील गीता सुभाष पवार यांनी साखरखेरडा पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीत त्यांच्या भाचीचा विवाह गावातील वर्दडी येथीलच अजय विजयपवार वय वर्षे 24 यांच्याशी झाला होता.

crime

अजय विजय पवार हा 1 जुलै रोजी दारू पिऊन मारहाण करीत होता त्यामुळे गिताबाई सुभाष पवार व त्यांचे भाऊ गणेश सुभाष भोसले हे त्याला समजवण्यासाठी गेले होते तेव्हा अजय विजय पवार व विजय रामसिंग पवार या पिता-पुत्रांनी संगणमत करून समजावण्यासाठी गेलेल्याबहिण-भावाला शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली एवढेच नव्हे तर अजयपवार याने गणेश सुभाष भोसले व विजय रामसिंग पवार याने लोखंडी रॉडने मारहाण केलीया घटनेत गणेश सुभाष भोसले हे गंभीर जखमी यांना चाकूने मानेवर व पोटावर वार करून जखमी केले यामध्ये गणेश सुभाष भोसले हे गंभीर जखमीझाले त्यांना बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात मध्येभरती केले .आरोपी पिता-पुत्रांना 2 जुलै रोजी मेहकर येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने 5 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.