Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

दारुसाठी पैसे न दिल्याने आईची हत्या करून अवयव खाल्ली भाजून. घटना माणुसकीला काळीमा फासणारी .

murder

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य घडले असून आईचा खून करून तिचे अवयव भाजून खाणाऱ्या मुलाला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे . दारुसाठी पैसे न दिल्याने सुनील कुचकोरवी याने आईची निघृण हत्या केली होती . त्यानंतर आईचे अवयव भाजून खाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी नराधम मुलाला बेड्या ठोकल्या होत्या . कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासातील ही पहिलीच फाशीची शिक्षा ठरली आहे . कोल्हापूर शहरातील माकडवाला वसाहतीत 28 ऑगस्ट 2017 रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती . कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला . असा घडला प्रकार कवळा नाका येथील वसाहतीत सुनील कुचकोरवी राहत होता . 28 ऑगस्ट 2017 रोजी आईने दारुसाठी पैसे न दिल्यामुळे त्याचा वाद झाला . त्यानंतर आई यल्लवा कुचकोरवी हिचा खून करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले . त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता . अत्यंत क्रूर खून खटल्याच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते . घटनेचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी केला . या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांच्या न्यायालयात सुरु झाले . सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट विवेक शुक्ल यांनी बाजू मांडली . दोन्ही बाजूच्यायुक्तिवाद झाला होता . न्यायालयाने सुनीलने केलेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचे सांगत फाशीची शिक्षा सुनावली . कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासातील ही पहिलीच फाशीची शिक्षा ठरली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.