Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जिल्ह्यात चित्रपटगृहे, बंदीस्त सभागृहे, जलतरण तलाव, नाट्यगृहे सुरू

एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेला परवानगी
जलतरण तलावसाठी खेळाडूचे लसीचे दोन्ही मात्रा आवश्यक
जिल्ह्यात चित्रपटगृहे, बंदीस्त सभागृहे, नाट्यगृहे एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच जलतरण तलाव सुरू करण्यासह परवानगी देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय साथरोग अधिनियम, फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कोरोना संसर्ग नियम पाळून चित्रपट गृहे, बंदीस्त सभागृहे, नाट्यगृहे व जलतरण तलाव सुरू करण्यास आदेशान्वये परवानगी दिली आहे. प्रतिबंधीत क्षेत्र वगळता चित्रपट प्रदर्शन सुरू करण्याकरीता ही परवानगी असणार आहे.

चित्रटगृह व नाट्यगृहांसाठी अशी आहे नियमावली : प्रेक्षागार, सामायिक क्षेत्रात व प्रतीक्षा क्षेत्रात किमान 6 फुट सुरक्षीत अंतर राखावे, नेहमी तोंड व नाकावर मुखपट्टी असावी, प्रवेश व निर्गमनाच्या मार्गांवर, सामायिक क्षेत्रात सॅनीटायझर उपलब्ध असावे, श्वसनविषयक शिष्टाचाराचे काटोकोरपणे पालन करावे,थुंकण्यास सक्त मनाई असावी, कोविड प्रतिबंधक लसीकरण झाल्याबाबतचे अंतिम प्रमाणपत्र भेट देणाऱ्यांनी दाखवावे, खाद्यगृहांमध्ये नियुक्त केलेले कर्मचारी, प्रेक्षकांना जागा दाखविणारे कर्मचारी, स्वच्छतेसाठी नियुक्त केलेले कर्मचारी यांचेसह सर्व कर्मचारी वर्गाचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झालेले असावे, चित्रपट / नाट्याचे तिकिट दाखविल्यावरच प्रवेश द्यावा, प्रवेश द्वारावर तापमान तपासणी करावी, लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश द्यावा, प्रेक्षागार, प्रवेश व निर्गमनाच्या ठिकाणी प्रेक्षकांकरीता रांगेसाठी आखीव खुणा कराव्यात, आतील आसन व्यवस्था पर्याप्त सुरक्षीत अंतर राखले जाईल अशी असावी, जी आसने वापरायची नसतील त्या आसनावर आसनांचा वापर करू नये असे स्पष्ट खुण करावी, मध्यंतरामध्ये सामायिक जागा, लॉबी व प्रसाधनगृहात गर्दी होवू नये याची दक्षता घ्यावी, गर्दी टाळण्यासाठी विविध पडद्यांवरील प्रदर्शनाच्या वेळांमध्ये योग्य अंतर राखावे, मल्टीप्लेक्समध्ये दोन पडदे असल्यास दोन्ही पडद्यावरील चित्रपट / नाट्य प्रदर्शनाच्या वेळा वेगवेगळ्या असाव्या, तिकट आरक्षणावेळी डिजीटल, संपर्करहीत व्यवहारांना अधिक प्राधान्य द्यावे, संपर्क व्यक्तीचा शोध घेणे सुकर होण्यासाठी आरक्षणावेळी संपर्क क्रमांक घ्यावे, तिकट काढतेवेळी रांगांचे व्यवस्थापन करावे, चित्रपट गृह / नाट्यगृह परीसरातील दांडे, कठडे आदींचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे, प्रत्येक प्रदर्शनानंतर प्रेक्षागाराचे निर्जंतुकीकरण करावे, सर्व कर्मचाऱ्यांनी मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून ॲप अद्ययावत ठेवावे, चित्रपट / नाटयगृह परीसरात प्रवेशद्वारे, तिकिट विक्री ठिकाणे, प्रसाधनगृहे आदी ठिकाणी काय करावे व काय करू नये याबाबतच्या सुचना लावाव्यात, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण व संसर्ग सुरक्षा नियम आदी घोषणा चित्रपट प्रदर्शनापूर्वी, मध्यंतरामध्ये व प्रदर्शनच्या शेवटी कराव्यात, लसीकरण मोहिमेची जनजागृती करावी, वातानुकूलीत उपकरणांचे तापमान 24 ते 30 अंश से. मर्यादेत असावे, सापेक्ष आर्द्रता 40 ते 70 टक्क्यांच्या मर्यादेत असावी, हवेचे पुर्नचक्रण टाळावे, केवळ आवेष्टीत खाद्यपदार्थ व पेय पदार्थ यांनाच परवानगी देण्यात येईल, चित्रपटगृहातील पडदा असलेल्या प्रेक्षागाराच्या आत खाद्यपदार्थ व पेय यांना मनाई असेल.

बंदीस्त सभागृह / मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम नियमावली : प्रवेशद्वारावर तापमान तपासणी करावी, एकूण बैठक क्षमतेच्या 50 टक्के इतक्या मर्यादेपेक्षा अधिक प्रेक्षक संख्या असू नये, उपस्थित सर्वांनी मास्क वापरावे, सामाजिक सुरक्षा अंतर राखावे, सादरकर्त्या कलाकारांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करावी, सर्व कलाकार / आयोजनप व साह्यभूत कर्मचारी यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण दोन्ही मात्रा झालेली असावी, कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणारे सर्व उपकरणे निर्जंतुकीकरण केलेली असावी, प्रेक्षकांना कालाकार कक्षात जाण्याची परवानगी नसावी, प्रवेश व निर्गमन, सामाईक क्षेत्रात हात स्वच्छ करण्यासाठी निर्जंतुक द्रव्य उपलब्ध असावे, कार्यक्रम संपल्यावर सभागृहाचे निर्जंतुकीकरण करावे, थुंकी उत्पन्न करणारे पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थ बाळगण्यास मनाई असावी, नशा आणणाऱ्या द्रव्यांचे सेवन करू नये, गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा व्यवस्था असावी, कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोना पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी यबाबत ध्वनीफित किंवा फलक लावावे. जलतरण तलाव नियमावली : जलतरण तलावातील जलतरणासाठी मुभा देण्यात आलेले वय 18 वरील खेळाडू व व्यवस्थापन, कर्मचारीवृंद यांचे कोविड लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असावे, वय 18 वर्षाखालील खेळाडूंच्या सरावासाठी संबंधित खेळाडूच्या पालकांचे संमतीपत्र व वयाचा पुरावा सोबत असावा. तरी या सर्व आदेशांचे कोणत्याही व्यक्ती, समूह, संस्था अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास, त्यांचेविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग अधिनियम, भारतीय दंड संहीता 1860 नुसार शिक्षेस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी आदेशीत केले आहे.

Gruha
Leave A Reply

Your email address will not be published.