Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

दिग्गजांच्या उपस्थितीत प्रसेंनजित पाटील यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये पक्षप्रवेश संपन्न. जळगाव जामोद ची जागा राष्ट्रवादीसाठी सोडणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार..

जळगाव जा प्रतिनिधी ( गजानन सोनटक्के ) :-दिनांक 23 जुन रोजी राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कापूस पणन महासंघाचे संचालक तथा जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसेनजीत पाटील यांनी ना डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. स्वगृही परतलेल्या प्रसेनजीत पाटील यांच्या येण्याने बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजून एक जागा भक्कम झाल्याचा विश्वास प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. प्रसेनजीत पाटील यांच्यामागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे. आपल्या भागातील धरणाचे काम अधिक जलद गतीने करून आपला पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

ncp

२०२४च्या निवडणुकीआधी हे काम पूर्ण करण्याचा विश्वास ना. जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. प्रसेनजीत पाटील यांच्या प्रवेशाने विदर्भात पक्षाला अधिक बळकटी मिळणार आहे. प्रतिकूल परिस्थिती बदलते, आपण जिद्द सोडायची नसते, आगामी सर्व निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच झेंडा फडकला पाहीजे अशा जोमाने सर्वांनी कामाला सुरुवात करा, असे आवाहन ना. अजितदादा पवार यांनी यावेळी उपस्थितांना केले. तसेच यावेळी प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच विधान परिषद सदस्य आमदार अरूण काका लाड यांच्या पुढाकाराने भाजपचे सांगली जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले यांनीही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, वरिष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी आ. उदयसिंग पाडवी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.