Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

वृद्ध साहित्यक व कलावंतांना मिळणार मानधन – 25 ऑगस्ट 2021 पर्यंत पंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करावे

बुलडाणा  दि. 7 : शासन निर्णय 7 फेब्रुवारी 2014 ला अनुसरून सन 2020-21 साठी मानधन घेवू इच्छिणाऱ्या सर्व वृद्ध कलावंतांना मानधन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सन 2020-21 मध्ये लाभ घेवू इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्यामार्फत सादर करावे लागणार आहे. शासन निर्णय 7 फेब्रुवारी 2014 नुसार अटी व शर्तींची पुर्तता करणाऱ्या मान्यवर वृद्ध कलावंत यांच्याकडून 25 ऑगस्ट 2021 पर्यंत  अर्ज मागविण्यात येत आहे.

old artist

  यापूर्वी या योजनेसाठी केलेले सर्व अर्ज दप्तर जमा झाल्याने ते अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. अर्जातील नमूद अटींची पुर्तता करणाऱ्या व आवश्यक त्या मूळ कागदपत्रांच्या छाननी अंतीचा पुरावा कागदपत्रासह सादरकेलेले केवळ वैध आणि योग्य अर्जच स्वीकारले जाणार असल्याने यासंबंधीत नियम व अटी, शर्ती अर्जदारांनी काळजीपुर्वक वाचुनच अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर येणारे अर्ज, अपूर्ण अर्ज, पुरावे नसलेले अर्ज किंवा पुर्वीचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना  पंचायत समिती कार्यालय येथे उपलब्ध आहे. तरी मानधन घेवू इच्छिणाऱ्या सर्व वृद्ध कलावंतांनी 25 ऑगस्ट 2021 पर्यंत या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य सचिव तथा अतिरिक्त   मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.