Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

राजर्षी शाहू महाराज सामाजिक गृप चा संकल्प IAS / IPS घडविण्याचा

सिंदखेडराजा -राजर्षी शाहू महाराज सामाजिक गृप व मातृतिर्थ सिंदखेडराजा नगरीतील सन्माननिय नागरिक , राजकीय सामाजिक, शैक्षणिक नेतृत्वांच्या मोलाच्या सहकार्याने आज नियोजित उपक्रमाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मा.सतिशभाऊ तायडे, उद्घाटक माजी नगराध्यक्ष मा.देविदासभाऊ ठाकरे तर प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष मा.विजयभाऊ तायडे,आरोग्य सभापती मा.राजूभाऊ आढाव,बांधकाम सभापती मा.योगेशभाऊ म्हस्के,माजी नगराध्यक्ष मा.सितारामभाऊ चौधरी, माजी उपनगराध्यक्ष मा.दिलीपभाऊ आढाव,माजी उपनगराध्यक्ष मा. प्रकाश मेहेत्रे, नगरसेवक आजिमभाई शेख

,पाणी पुरवठा सभापती मा.कैलासभाऊ मेहेत्रे, नगरसेवक मा.नरहरी तायडे,सभापती मा.बाळुभाऊ म्हस्के,नगरसेवक मा.गौतमभाऊ खरात, गटनेते मा.भिवसनभाऊ ठाकरे,शिवसेना नेते मा.शिवप्रसाद ठाकरे,अडगाव राजा उपसरपंच मा.प्रकाशभाऊ सोनुने (नंदिनी काॅम्पुटर),मा.तुळशिदासभाऊ चौधरी,मा.भगवानभाऊ सातपुते, मा.डॉ.यशवंत झोरे,महात्मा फुले समता परिषद तालुका अध्यक्ष मा.अड संदिप मेहेत्रे माळी कर्मचारी तालुका कार्याध्यक्ष मा.नंदकिशोर खरात सर,माळी कर्मचारी तालुका अध्यक्ष मा.संजय ठाकरे सर, दलित पँथर सेना राज्य उपाध्यक्ष पत्रकार मा.रामदास कहाळे


प्रसंगी या उपक्रमाला मदत म्हणून शिवसेना नेते मा.शिवप्रसादभाऊ ठाकरे यांनी आजींच्या स्मृती आठवणी पित्यर्थ दरवर्षी 5100/-, एमपीएससी विद्यार्थी साहित्य खरेदी साठी नगरसेवक मा.नरहरीभाऊ तायडे 11000/-, राष्ट्रवादी नेते उपनगराध्यक्ष मा.विजयभाऊ तायडे दरवर्षी 2100/-, आरोग्य सभापती – संभाजी ब्रिगेड राज्य उपाध्यक्ष मा.राजूभाऊ आढाव वडीलांच्या स्मृती पित्यर्थ दरवर्षी 2100 /-, नंदिनी काॅम्पुटर चे संचालक तथा उपसरपंच आडगाव राजा मा.प्रकाशभाऊ सोनुने 1100/-,दलित पॅंथर सेनेचे राज्य उपाध्यक्ष पत्रकार मा.रामदासभाऊ कहाळे दरमहिना मासिक वर्गणी 200/-,तर 100 – 150 विद्यार्थींना बसण्यासाठी मॅटचटई महात्मा फुले समता परिषदेचे ता अध्यक्ष मा.अॅड संदिपभाऊ मेहेत्रे यांनी देवू केली आहे.


राजर्षी शाहू महाराज सामाजिक गृपच्या संकल्प IAS /IPS घडविण्याचा…. कार्यक्रम प्रसंगी मा. राधाजी ठाकरे सरांनी प्रास्ताविकात गृपचा ईतिहास सांगून भविष्यातील उपक्रम नगरीपुढे ठेवले.आरोग्य सभापती मा.राजूभाऊ आढाव यांनी IAS घडविण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. माजी नगराध्यक्ष मा.देविदासभाऊ ठाकरे व नगराध्यक्ष मा.सतिशभाऊ तायडे व मान्यवरांनी उद्घाटन केले. शेवटी कार्यक्रम अध्यक्ष नगरीचे नगराध्यक्ष मा. सतिशभाऊ यांनी शिक्षणाने जो मानसन्मान मिळतो तो दुसरा कशानेच मिळत नाही असे सांगून गावातीलच शाळेतच शिकविण्याचा आग्रह धरला. कारण गावातच शिकून मोठ मोठ्या पदावर पोहचले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.गणेश मेहेत्रे सरांनी तर आभार मा.प्रकाश मेहेत्रे सरांनी केले. आयोजनात सर्व राजर्षी शाहू महाराज सामाजिक गृप चे डॉक्टर,इंजिनिअर , प्राध्यापक,शिक्षक, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक,व्यापारी मित्रमंडळ मोठ्या संख्येने हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.