वटसावित्री पौर्णिमा निमित्त पोलीस स्टेशन सिंदखेडराजा येथे वृक्षारोपण धरती बचाओ परिवार व महिला दक्षता समितीचा पुढाकार
रवींद्र सुरूशे सिंदखेड राजा वटसावित्री पौर्णिमा हा सण संपूर्ण भारत देशात हिंदू धर्मीय महिला मोठ्या श्रद्धेने साजरा करतात.या निमित्ताने महिला- माता-भगिनी वटवृक्षाला फेऱ्या मारून त्याची पूजा करून आपल्या पतीसाठी भरपूर आयुष्य व आरोग्य मागत असतात.असे जरी असले तरी बदलत्या काळानुसार पतीच नव्हे तर प्रत्येकाला निरामय व भरपूर आयुष्य मिळावे यासाठी केवळ वटवृक्षाला फेऱ्या मारून चालणार नाही तर वटवृक्षाचे तथा इतर देशी वृक्षांचे मोठ्या प्रमाणात रोपण व संगोपन करणे महत्त्वाचे असल्याचे जाणत धरती बचाओ परिवार व महिला दक्षता समितीच्या वतीने पोलीस स्टेशन सिंदखेडराजा येथे पाच देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी पोलीस स्टेशन सिंदखेडराजा चे ठाणेदार श्री.जयवंत सातव,महिला दक्षता समिती पोलीस स्टेशन सिंदखेडराजा च्या अध्यक्षा सौ. छाया कुलकर्णी,धरती बचाओ परिवाराचे विश्वस्त वनश्री.जना बापू मेहेत्रे,पोलिस हेड कॉन्स्टेबल अरुण मोहीते,पर्यावरण प्रेमी सौ.कीर्ती देशपांडे,सौ.सुनिता असोलकर,सौ.प्रमिलाताई तरवडे, सौ.कुंदा मुळे,श्रीमती अपर्णा पाठक,श्री.सटवाजी सोनुने आदींनी वृक्ष पूजन करून वृक्षारोपण केले.
याप्रसंगी ठाणेदार श्री.सातव,सौ.छाया कुळकर्णी,वनश्री.जनाबापू मेहेत्रे यांनी समाजाला पौराणिक संदर्भ असलेले,आयुर्वेदिक व देशी वृक्षांचे रोपण करून त्यांचे उचित संगोपन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस स्टेशन,सामाजिक वनीकरण कार्यालय सिंदखेडराजा व धरती बचाओ परिवार यांनी परिश्रम घेतले.