Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

संभाजी महाराजांबद्दल प्रत्येकाच्या मनात आस्था आहे, त्यातून प्रत्येक जण आपल्या मतानुसार त्यांना बिरुद लावतं. त्यासाठी वाद करण्याचं कारण नाही.

विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणण्याच्या वक्तव्यावर आंदोलन होत असतांना सर्वसामान्यपणे प्रत्येकाने समजुन घेतले पाहिजे . असं म्हणत असतांना अजितदादा पवार यांनी कुठेही छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाची किंव्वा प्रतिष्ठेची हानी होईल असं वक्तव्य केलेलं नाही आणि कोणास बळजबरी किव्वा हट्ट हि केलेला नाही कि मी म्हणेल तीच उपाधी वापर करा .

SAMBHAJI RAJE

अमोल भट
९९७०७४४५५४
छत्रपती , स्वराज्याच धाकलधनी , छावा ,संभाजीराजे , स्वराज्यरक्षक , धर्मवीर, संभाजीराजे असं वेगवेगळे नावास विशेषण लावुन नामउल्लेख होतो या सर्व उल्लेखातुन ज्याला जसे पटले तसे तो विशेषण लावतो यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिष्ठां कमी करण्याचा कोणाचा उद्देश नसतो पण काही उपाधी या त्याच व्यक्तीस शोभतात किव्वा त्या उपाधी समोर येताच एकच नाव आणि प्रतिमा समोर येते . जसे कि छत्रपती म्हटल्यावर शिवाजी महाराज व संभाजी महाराज हेच आठवतात तश्या प्रकारची छत्रपती संभाजी महाराजांना लावलेली उपाधी इतर कोणास का लावावी किव्वा ती उपाधी जर त्या महान व्यक्तिमत्वास सिमीत समाज ,धर्म यासाठी बांधुन न ठेवता सर्वव्यापी बनवणारी असेल तर त्यावर निषेध कश्यासाठी ? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले – सावित्रीबाई फुले यांच्यावर टिप्पणी झाली तेव्हा गप बसणारे आज एका उपाधीवर विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा राजीनामा मागत आहे . जे आज अजितदादांचा राजीनामा मागत आहे त्यांच्यासाठी वाचाळ वक्त्यव्याकरणाऱ्यांची काही नाव आठवुन द्यावी वाटतात

      छत्रपती , स्वराज्याच धाकलधनी , छावा ,संभाजीराजे , स्वराज्यरक्षक , धर्मवीर, संभाजीराजे असं वेगवेगळे नावास विशेषण लावुन नामउल्लेख होतो या सर्व उल्लेखातुन ज्याला जसे पटले तसे तो विशेषण लावतो यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिष्ठां कमी करण्याचा कोणाचा उद्देश नसतो पण काही उपाधी या त्याच व्यक्तीस शोभतात किव्वा त्या उपाधी समोर येताच एकच नाव आणि प्रतिमा समोर येते . जसे कि छत्रपती म्हटल्यावर शिवाजी महाराज व संभाजी महाराज हेच आठवतात तश्या प्रकारची छत्रपती संभाजी महाराजांना लावलेली उपाधी इतर कोणास का लावावी किव्वा ती उपाधी जर त्या महान व्यक्तिमत्वास सिमीत समाज ,धर्म यासाठी बांधुन न ठेवता सर्वव्यापी बनवणारी असेल तर त्यावर निषेध कश्यासाठी ? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले - सावित्रीबाई फुले यांच्यावर टिप्पणी झाली तेव्हा गप बसणारे आज एका उपाधीवर विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा राजीनामा मागत आहे . जे आज अजितदादांचा राजीनामा मागत आहे त्यांच्यासाठी वाचाळ वक्त्यव्याकरणाऱ्यांची काही नाव आठवुन द्यावी वाटतात 
 • आज के शिवाजी नरेंद्र मोदी नावाचे जय भगवान गोयल या भाजप नेत्याने पुस्तक काढले होते .
 • महाराजांना शिव्या दिल्या – श्रीपाद छिंदम
 • महाराजांच्या पुण्यतिथीला ढोल वाजवले – विनोद तावडे
 • महाराज हे जुन्या काळातील आदर्श – भगतसिंग कोश्यारी
 • महाराज आग्र्याहुन सुटले तसे शिंदे शिवसेनेतुन सुटले – मंगलप्रभात लोढा
 • समर्थ रामदास नसते तर छत्रपतींना कोणी विचारले नसते – भगतसिंग कोश्यारी
 • महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली – सुधांशु त्रिवेदी
 • नाशिक पोलीस आयुक्त छत्रपती आहेत काय ? – देवेंद्र फडणवीस
 • शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणातला – प्रसाद लाड
 • औरंगजेबजी – चंद्रशेखर बावनकुळे
  हि सर्व यादी पाहिल्यावर मनात एक शंका येते की एका पक्षाची हि जाणुन बुजुन केलेली रणनीती तर नाही ना ?
  किव्वा अजितदादा पवार यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना त्यांच्याच पक्षातील लोकांची वाक्य माहित नसावी !

पवार साहेब पुर्ण बोलले ते सांगा ज्यांना धर्मवीर म्हणायचे त्यांनी म्हणावे, धर्मवीर म्हणजे एकाच धर्माचे आहेत असा त्याचा अर्थ होतो, ज्यांना स्वराज्यरक्षक म्हणायचे आहे त्यांनी म्हणावे, स्वराज्यरक्षक, म्हणजे सर्व रयतेचे स्वराज्यरक्षक आहेत, यामध्ये या मध्ये काय शंका नाही पण अजित दादा पवार योग्यच बोलले असे पवार साहेब म्हणाले.

‘ज्या नागरिकांना किंवा समाज घटकांना स्वराज्य रक्षक म्हणून संभाजी महाराजांनी केलेल्या कामगिरीची आठवण होत असेल त्यांनी तसा उल्लेख करण्यात काही चुकीचं नाही. कोणाला ‘धर्मवीर’ म्हणून उल्लेख करायचा असेल तर त्यालाही माझी काही हरकत नाही. प्रत्येक व्यक्तीचं त्याचं मत आहे. त्याला ते मांडायचा अधिकार आहे. ज्यांना जे हवं आहे, ते त्यांनी म्हणावं. पण, आम्हाला हवा तो उल्लेख केला नाही म्हणून जे काही सुरू आहे, ते चिंताजनक आहे, असं ते म्हणाले. हे सांगताना शरद पवार यांनी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचं उदाहरण दिलं. त्यांना काही लोक धर्मवीर म्हणतात. सरकारी जाहिरातीतही तसा उल्लेख दिसतो. माझी त्याबद्दलही तक्रार नाही. फक्त दुसऱ्यानंही तेच म्हणावं हा हट्ट बरोबर नाही, असं शरद पवार म्हणाले.

‘संभाजी महाराजांबद्दल प्रत्येकाच्या मनात आस्था आहे, त्यातून प्रत्येक जण आपल्या मतानुसार त्यांना बिरुद लावतं. त्यासाठी वाद करण्याचं कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर राज्याचं रक्षण करण्यासाठी संभाजीराजांनी जे महत्त्वाचं काम केलं, त्याची नोंद घेऊन त्यांना कुणी स्वराज्यरक्षक म्हणत असेल तर तेही चुकीचं नाही,’ असं शरद पवारांनी नमूद केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.