कोनड खुर्द येथील ग्रा.से. स. संस्थेच्या अध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सचिव भास्करराव जावळे तर उपाध्यक्षपदी दौलतराव वानखेडे
चिखली तालुक्यातील कोनड खुर्द येथील ग्राम सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक १६ फेब्रुवारी रोजी अविरोध संपन्न झाली होती.
आज दिनांक २२ मार्च रोजी अध्याशी अधिकारी श्री आर.एस. काळे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत सर्वानुमते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुका सचिव भास्करराव जावळे यांची फेरनिवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी दौलतराव वानखेडे यांची निवड करण्यात आली.
सर्व नवनियुक्त संचालकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जिल्हाध्यक्ष तथा ग्रामसेवा सहकारी संस्था कोनड खुर्द चे संचालक राजीव भगवानराव जावळे यांनी सुचित केलेले भास्करराव जावळे यांची सर्व संचालकांनी सर्वानुमते अध्यक्ष पदी तर रामदास पांडुरंग जावळे यांनी सुचित केलेले दौलतराव वानखेडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
याप्रसंगी रामदास अश्रू जावळे, रामदास पांडुरंग जावळे, श्रीमती पारूबाई नारायण जावळे, राजीव भगवानराव जावळे, पंजाबराव गुलाबराव जावळे, सौ प्रमिला भिकाजी सुरडकर, अशोक वामन दिवटे, देविदास कडुबा जावळे, दामोदर भिमराव वानखेडे, यादव तुकाराम वानखेडे इत्यादी संचालक उपस्थित होते.
सदर निवड झाल्यानंतर कोनड खुर्द येथील सरपंच श्री दादाराव सुरडकर उपसरपंच प्रतिनिधी गजानन जावळे तथा माजी सरपंच तुळशीदास जावळे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार केला.
या नियुक्ती निमित्त सर्व नवनियुक्त संचालकांचे चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जिल्हाध्यक्ष राजीव भगवानराव जावळे यांनी शिवशंभू अर्बन येथे नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा सर्व संचालकांचा सत्कार करून अभिनंदन केले.
