Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

तालूक्यात पावसाने दडी मारल्याने
सोयाबीन पिकाने माना टाकल्या शेतकरी चिंताग्रस्त
सिंदखेडराजा(प्रतिनिधी सचिन मांटे)

Sachin mante

तालूक्यात पावसाने दडी मारल्याने
सोयाबीन पिकाने माना टाकल्या शेतकरी चिंताग्रस्त
सिंदखेडराजा(प्रतिनिधी सचिन मांटे) –
तालुक्यात पावसाने गेल्या एक आठवड्यापासून पावसाने चांगलीच दडी मारल्याने कपाशी तूर उडीद मुग हे पिक सूकू लागले तर सोयाबीन पिकाने माना टाकायला सुरुवात केली असल्याचे चित्र दिसत आहे सध्या उन्हाळ्यासारखे उन तापत असल्याने पिकाचे फुले गळण्याची भिंती शेतकऱ्यांनी व्यक्त करीत असून चिंताग्रस्त आहे
तालूक्यात यावर्षी काही भागात जुन तर काही भागात जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे काही शेतकऱ्यांची पेरणी मिरगात तर काही ची पंधरा दिवसानंतर झाली पेरणी ही साधली जुन व जुलै या दोन महीण्यात पाऊसही चांगला पडल्याने पिकेही चांगली बहरात आली . ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने काही भागात जोरदार हजेरी लावून दाणादान उडविली होती . परंतू असे असतांना ९ ऑगस्ट पासून पावसाने एकदमच पाठ फिरवली . आठ दिवस चांगलं वाटलं , पण गेल्या दोन तिन दिवसापासून मात्र उन्हाळ्यासारखे कडक ऊन तापायला सुरुवात झाली यामुळे जमिनीला भेगा पडल्या . सोयाबीन कंबरेला भिडली तिला सध्या फुलही लागले अशा अवस्थेतच पावसाने दडी मारल्याने पाण्यासाठी पिके आतुर झाली सदर पिक हे माना टाकत आहे त्यामुळे आज पाऊस येईल , उद्या येईल परंतू पाऊस पडला नाही त्यामुळे शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत आहे कारण सध्या कपाशी व सोयाबीनची वाढ झाली पिक फुलात आहेत जर यावस्थेत त्याला झटका बसला तर फुल गळती होणार त्यामुळे पिकाला पाहीजे तसी झडती येणार नाही त्यामुळे उत्पन्नात घट येणार आगोदरच आर्थीक संकाटात सापडलेल्या बळीराजाने याच पिकांच्या भरवशावर खाजगी सावकार व्याजाने व ‌‌ बँकाकडून घेतलेल्या पैशाची परत फेड कशी करायची? पिक येतील का? कर्ज फिटेल का? अशा विवंचनेत शेतकरी दिसत असून चिंताग्रस्त आहे

Leave A Reply

Your email address will not be published.