
देऊळगावराजा – देऊळगावराजा शहरातील साक्षी वाघ ह्या विद्यार्थीने अस्वलांचे संरक्षण या विषयावर लिहिलेला कथेला डब्ल्युसीबी रिसर्च फांऊडेशनच्या वतीने सर्वोत्कृष्ट कथेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
या कथेवर अँनिमेशन व्दारे लघुचित्रपट तयार करण्यात आला, तिच्या या यशाबद्दल राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दुरध्वनी वरून साक्षीचे अभिंनदन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व्यंकटेश महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी वाघ व तिचे वडील कैलास वाघ यांचे अभिनंदन केले यावेळी विधानसभा अध्यक्ष गजानन पवार, मा. नगराध्यक्ष कविंश जिंतुरकर , अरविंद खांडेभराड उपस्थित होते.साक्षी वाघ यांच्या या यशाबद्दल सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .