शेगाव- बुलढाणा जिल्हा संगणक टंकलेखन संस्था चालकाच्या अध्यक्ष पदावर खामगाव येथील शर्मा संगणक टायपिंग अँड शॉर्टहॅन्ड इन्स्टिट्यूट च्या संस्था चालक सौ कविता दिपक शर्मा यांची एक मताने निवड करण्यात आली
अध्यक्षपदी सौ. कविता शर्मा
शेगाव- बुलढाणा जिल्हा संगणक टंकलेखन संस्था चालकाच्या अध्यक्ष पदावर खामगाव येथील शर्मा संगणक टायपिंग अँड शॉर्टहॅन्ड इन्स्टिट्यूट च्या संस्था चालक सौ कविता दिपक शर्मा यांची एक मताने निवड करण्यात आली
संघटनेच्या लोणार येथे झालेल्या बैठकीत विध्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम वावगे याची प्रकृती ठिक नसल्याने आपल्या संघटना करिता अध्यक्ष नेमण्याची विनंती केली होती, त्या अनुषंगाने ही निवड करण्यात आली, सौ शर्मा ह्या खामगाव येथील अनेक सामाजिक संस्थेत जुळलेल्या आहे, योगायोनाने मातृदिनी निवडझाल्या मुळे त्याचे संघटनेला मातृत्वाचे प्रेम मिळेल तसेच सर्वं संस्था चालकांना शासनाचे नियमाप्रमाणे न्याय मिळुन देण्यास सतत प्रयत्न करतील, संघटनेच्या 30 वर्षात प्रथमच महिला अध्यक्ष मिळाल्यामुळे महिला संस्था चालक सक्रिय होतील ही अपेक्षा राज्य संघानेचे प्रतिनिधी अरुण चांडक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले. तसेच या बैठकीत सिंदखेडराजा येथील संस्था चालक अमोल भट याची राष्ट्रवादी काँग्रेस च्या जिल्हा प्रवक्ते म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला, बैठकीत म.राज्य परीक्षा परिषद यांनी संगणक टायपिंग ची परीक्षा जून पूर्वी पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली, जिल्ह्यात संगणक टायपिंग व शॉर्टहॅन्ड चे खाजगी रित्या अवैधप्रशिक्षण देणे सुरूअसून त्यामुळे विद्यार्थी व पालकवर्गाची दिशाभुल होत आहे, अस्या अनधिकृत संस्थेवर व त्याचे विद्यार्थी बसविण्यात आलेल्या सरकार मान्य संस्थेवर मा. शिक्षणाधिकारी यांनी त्वरित कारवाई करण्यात यावी, मागील 10 वर्षा पासून शासनाने मजूर केलेली फी रु 4700 ही वाढलेली महागाई पाहता रु 6000 करण्यात यावे, मा, शिक्षणाधिकारी यांचे थकीत असलेले तक्रार जिल्हा समन्वय समिती ची बैठक बोलावून त्वरित निकाली काढण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष अजय चव्हाण, संचलन अमोल भट, बैठकीचे संचलन सचिव रवी देशमुख, आभार प्रदर्शन गजानन चोपडे लोणार यांनी केले , बैठकीला 53 संस्था चाक हजर होते,