जाफ्राबाद, – दि. ३० कोरोनाच्या पाश्वभूमीवर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे जिकरीचे झाले आहे. शैक्षणिक संस्था मात्र कोणत्याही प्रकारची तडजोड करायला तयार नाहीत.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
जाफ्राबाद शहरातील सिध्दार्थ महाविद्यालयात उपक्रमाची सुरुवात करून याबाबतचे लेखी निवेदन प्राचार्य मोहन बिरादर यांना देण्यात आले.
यावेळी संस्थाचालक दादासाहेब म्हस्के, प्रा. मोहन बिरादर , गजानन लोखंडे, प्रा. वाटेत पटेल, अमोल शेळके आदी उपस्थित होते.
शैक्षणिक संस्थांनी शिक्षण शुल्कात कपात न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.