Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जळगाव जामोद येथे शिव संपर्क मोहिमेस सुरुवात

गजानन सोनटक्के जळगाव जा – मा ना उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार बुलडाणा जिल्ह्यात शिव संपर्क मोहीमेला सुरवात. शांतारामजी दाणे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच, सहसंपर्क प्रमुख मा दत्ताभाऊ पाटील, शिवसेना ऊपजिल्हाप्रमुख मा तुकाराम काळपांडे शिवसेना तालुका प्रमुख गजानन भाऊ वाघ पंचायत समिती मा ऊपसभापती विजुभाऊ काळे नगर परीषद जळगाव शिक्षण सभापती तथा नगरसेवक मा रमेश भाऊ ताडे खरेदी विक्री संचालक संजय भुजबळ खेर्डा बु सरपंच नरेश वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव तालुक्यातील पंचायत समिति वडशिंगि सर्कल येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न.

shivsampark


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा ना उद्धवजी ठाकरे साहेब यांनी नुकतीच मुंबई येथे शिवसेना जिल्हाप्रमुखांची आढावा बैठक घेऊन महाराष्ट्रभर शिव संपर्क मोहीम राबविण्यासाठी सर्व जिल्हाप्रमुखांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने आज दि १४/७/२०२१ रोजी मा शांतारामजी दाणे पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली.


बैठकीत पक्ष संघटन करणे, गावागावात शिवसेना शाखा स्थापन करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे, रिक्त असलेले विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांची पदे भरणे, गावागावात शिवसेना शाखेचे फलक लावणे, तसेच आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे इ. विषयावर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.