Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

शेतकर्याची बियाण्यासाठीची शेगाव वारी टळली…स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांच्या मागणीची दखल

चिखली प्रतिनिधी – चिखली-तालुक्यातील आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकर्याना अनुदानीत बियाणे साठी परमीट वाटप करण्यात आले होते.तर बियाणे शेगाव वरुण घेऊन येण्याचा सल्ला तालुक्यातील शेतकर्याना देण्यात आला होता. याची माहिती स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांना मिळाल्याने सरनाईक यांनी महाबिज व कृषीच्या वरीष्ठांशी संपर्क साधुन यामधे तोडगा काढल्याने शेतकर्याची बियाण्यासाठीची शेगाव वारी टळली आहे.तर त्या परमीट धारकांना चिखलीतीच बियाणे मिळणार आहे.

चिखली तालुक्यातील शेतकर्यानी अनुदानीत बियाणेसाठी आॅनलाइन अर्ज केले आहेत.तर प्रमाणीत व अनुदानीत सोयाबीन व इतर बियाणे मिळावे यासाठी धडपड करीत आहेत.दरम्याण दि०८जुन रोजी चिखली कृषी विभागाकडुन परमीट देण्यात आले होते.तर परमीट वर शेतकर्याना शेगाव येथील विदर्भ अॅग्रो,श्री अॅग्रो व इतर कृषी केंद्रावरुण बियाणे घेऊन येण्याचा सल्ला देण्यात आला होता.अनुदानीत सोयाबीन व इतर बियाणे बॅग साठी वाहतुक खर्च न परवडणारा असल्याने याबाबतची माहिती शेतकर्यानी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सदस्य तथा स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांना दिल्याने सरनाईक यांनी शेतकर्यासह दि०९जुन रोजी चिखली कृषी विभाग गाठुण तालुका कृषी अधिकारी यांना याबाबत जाब विचारण्यात आला दरम्याण महाबिज कडुन बियाणे चिखलीत उपलब्ध करुण दिले न गेल्याचे समोर आल्याने सरनाईक यांनी जिल्हा व्यवस्थापक श्री मुराळे व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री नाईक यांच्याशी भ्रमनध्वनी व्दारे संपर्क साधुन चर्चा केली व याबाबत तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली बियाणे चिखलीत देण्यात यावे,अशी मागणी लावुन धरण्यात आल्याने व शेतकर्यासह स्वाभिमानी ने आक्रमक पावित्रा घेतल्याने शेतकर्याची बियाण्यासाठीची शेगाव वारी टळली असुन तालुका कृषी अधिकारी श्री शिंदे यांनी याबाबच्या सुचना कृषी सहाय्यकांना दिल्या आहेत.तर त्या परमीट धारक शेतकर्याना चिखलीतच बियाणे मिळणार असल्याचे कळविण्यात आले आहे.तर तेल्हारा,आन्वी,पेठ,व तालुक्यातील त्या परमीट धारक अंदाजे १६१ शेतकर्याना आता चिखली येथे अनुदानीत बियाणे मिळणार असल्याने वाहतुक खर्च वाचल्यामुळे शेतकर्याना दिलासा मिळाला आहे.यावेळी विनायक सरनाईक,नितिन राजपुत,गणेश थुट्टे,संदिप जाधव,भगवान चव्हाण,मनोज कुटे,संजय वाघमारे,हरीदास कराडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.