श्रीरामजी कुटे चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव जामोद अंतर्गत स्वखर्चातून ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर बँक ची निर्मिती..
जळगांव जा.प्रतिनिधी :- भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या श्रीराम कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव जामोद यांनी अंतर्गत स्वखर्चातून ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर बँकेची निर्मिती तयार करण्यात आली आहे.
रुग्णांना ऑक्सीजन चा खर्च परवडणार नाही तसेच गरजू रुग्णांचा खर्च कमी व्हावा म्हणून ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर बँकेची निर्मिती तयार करण्यात आली आहे. तसेच यावेळी मेहकर मतदार संघाकरिता दहा ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर तसेच सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघा करिता दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यासह जळगाव जामोद आणि संग्रामपूर साठी तीस ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटअर आणि 30 बेड देण्यात आले आहेत. तसेच येत्या दहा दिवसांमध्ये मुंबईवरून आणखी ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटअर मिळणार असून गरजू रुग्णांना मोफत देण्यात येणार आहे. तसेच 18 वर्षे वयोगटातील च्या आतील ज्या मुलांचे कोरोणामुळे पालकत्व हरविले आहे अशा मुलांना श्रीराम कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट दत्तक घेणार असून त्या मुलांचा शिक्षणापासून चा संपूर्ण खर्च श्रीरामजी कुटे चँरीटेबल ट्रस्ट च्या वतीने करण्यात येणार आहे. असे जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. तसेच यावेळी डॉक्टर राजेश सराफ जिल्हा अध्यक्ष वैद्यकीय आघाडी,विजय भालतडक ता.अध्यक्ष शेगाव, ज्ञानेश्वर सारवरे शहर अध्यक्ष शेगाव, डॉ. संतोष भाकरे अध्यक्ष डॉक्टर सेल शेगाव, बाबाराव मुंडे तालुका अध्यक्ष लोणार, अँड शिव ठाकरे ता.अध्यक्ष मेहकर,लोकेश राठी ता.अध्यक्ष संग्रामपूर,विलास इंगळे शहर अध्यक्ष संग्रामपूर, रोशन कोब्रा मेहकर, डॉ. चांडक डॉ. सेल सुनगाव, प्रकाश वाघ तालुका अध्यक्ष जळगांव जामोद, अभिमन्यू भगत शहर अध्यक्ष जळगांव जा.,डॉ. मानके,डॉ. शिंदे, विनोद वाघ,गजानन भुले,पंकज देशमुख यावेळी उपस्थित होते.