Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

एस टी ची रातराणी बस सेवा २० ऑगस्ट पासून सुरू

बुलडाणा, दि. १९: एस टी महामंडळाची रातराणी बस सेवा कोविड मुळे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली होती. ही बस सेवा २० ऑगस्ट २०२१ पासून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.   रातराणी बस सेवेमध्ये बुलडाणा ते नागपूर रात्री ९ वाजता, बुलडाणा ते पुणे रात्री ९. १५ वा, मेहकर ते पुणे रात्री ७.३० वा, मलकापूर ते पुणे (पिंपरी चिंचवड) सायं ६.३० वाजता आदींचा समावेश आहे.

st bas

सद्यस्थितीत महामंडळ जलद, वातानुकूलित शिवशाही आदी सेवेद्वारे प्रवाशी वाहतूक करीत आहे. तरी २० ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या रातराणी बस सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.  *****महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा दौराबुलडाणा, (जिमाका) दि. १९:  राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब दिनांक २० व २१ रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे : दिनांक २० ऑगस्ट रोजी सायं ६ वाजता अमरावती येथून मोटारीने शेगाव कडे प्रयाण, रात्री ८.३० वाजता शासकीय विश्राम गृह शेगाव येथे आगमन व राखीव, मुक्काम करतील. दिनांक २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता स्व. शिवशंकर भाऊ यांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट, सकाळी १० वाजता मोटारीने बाळापूर जि. अकोला कडे प्रयाण करतील. 

Leave A Reply

Your email address will not be published.