सिंदखेड राजा रवींद्र सुरूशे – अंकुर ऊल्हासराव देशपांडे यांचेसहकार्यासमवेत भारतिय स्टेट बँके साखरखेर्डाला दिला आंदोलनाचा ईशारा..करोना या महामारीच्या व लॉकडॉऊनमुळे, सद्यस्थितीत शेतकरी हवालदिल झालेले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यामातून आधार देणे आवश्यक आहे.खरीप हंगाम सुरू झाला आहे. मान्सून पूर्व पाऊस जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे शेतकरी आपली शेती पेरणीसाठी सज्ज करीत असून शेतकरी जोमाने खरिप हंगामाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे बँकांनी आता पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी. पिककर्जासाठी शेतकऱ्यांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी करु नये, शेतकऱ्यांना बँकेच्या दारात ताटकळत उभे ठेऊ नये.
बँकांनी पीक कर्जासाठी लागणारे कागदपत्रांची माहिती शाखेच्या दर्शनी भागात फलकावर किंवा बॅनर वर लावावी. जेणेकरुन शेतकऱ्यांना कागद पत्रांची माहिती होईल. कुणालाही विचारायची गरज पडणार नाही. बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण करताना उद्घट वागणूक देवू नये. व्यवस्थित समजावून सांगत शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मदत करावी. खरीप हंगाम तोंडावर आलेला असुन शेतकऱ्यांना खते, बि बियाणे आदी कृषी निविष्ठा खरेदीसाठी पिक कर्ज तातडीने उपलब्ध करुनन या महामारीच्या काळात शेतकऱ्यांना आधार देण्यात यावे.
तसेच डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा
पीककर्ज वाटपात शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही शेतकऱ्यांनी पेरणीपुर्वी पिककर्ज न दिल्यास शेकऱ्यांकरीता भारतिय जनता पार्टी युवा मोर्चा चे वतिने तिव्र स्वरुपात आंदोलन करण्यात येईल असा ईशारा वजा निवेदन अंकूर ऊल्हासराव देशपांडे भाजयूमो बूलडाणा जिल्हा सरचिटनीस यांनि दिला आहे…सदर निवदन देन्यासाठी गोपाल पाझडे..भाजपा तालूका अध्यक्ष,योगेश नन्हई,अनिकेत ईंगळे.गजानन पंचाळ —भाजयूमो तालूका ऊपाध्यक्ष,, अभय वाघ—भाजयूमो ता.उपाध्यक्ष,,संग्रामसिंग राजपूत ग्रामपंचायत सदस्य साखरखेर्डा..अनिल चांगाडे,,जालमसिंग ठाकूर ,,रविंद्र जगताप, भाजपा शहर अध्यक्ष हर्षल खरात गोपाल रामसिंग शिराळे – सामाजिक कार्यकर्ते.इ. कार्यकर्ते उपस्थीत होते.