बुलडाणा : शासनाच्या ग्राम विकास विभागाने 20 मार्च 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आर आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना जाहीर केलेली आहे. या योजनेकरीता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून देण्यात आलेला आहे. त्यासाठी 10 जुन 2021 ते 31 डिसेंबर 2021 कालबद्धता निश्चित केलेली आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक पंचायत समिती मधील एका ग्रामपंचायतीला तालुका सुंदर गाव म्हणून घोषीत करण्यात येते. सदर ग्रामपंचायतीला रूपये 10 लक्ष तसेच जिल्हा सुंदर ग्रामपंचायतीला रूपये 40 लक्ष पारितोषिक प्राप्त होणार आहे. सुरूवातीला योजनेत सहभागी होवू इच्छिणाऱ्या गा्रमपंचायतींनी 20 जुन 2021 पर्यंत स्वमुल्यांकन अहवाल पंचायत समितीला सादर करावयाचा आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी केले आहे.
Related Posts