Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

कृषी सेवाकेंद्र सुरू ठेवण्यास मुभा वाढली सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू

AGRO CENTER

बुलडाणा, दि. 8 : जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र, कृषी शी निगडित दुकाने , कृषी प्रक्रिया उद्योग , शेती अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबधित दुकाने , तसेच कृषी विषय सेवा आदी वाढीव वेळेनुसार सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी कृषी निगडित दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी होती. या आदेशात अंशत : बदल करण्यात आला आहे , असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष एस. रामामुर्ती यांनी दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.