सूनगाव ग्रामपंचायत लिपिकाचा हलगर्जी पणा
दीड वर्षांपासून केली नाही नोंद
गजानन सोनटक्के जळगाव जामोद
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत असून येथे दहा ते बारा कर्मचारी कार्यरत आहेत परंतु लोकांची कामे जसे की नोंद व मिळणारे दाखले किंवा गाव विकास संबंधी घेतलेले ठराव यांची अंमलबजावणी इतरत्र कागदपत्रे यांची वेळेवर मासिक मिटिंग मध्ये ठराव पास झाल्यानंतर व खरेदीखत नोंदीचा ठराव घेतल्या नंतर ही लोकांच्या खरेदीखता नुसार नोंदी होत नाहीत व घेतलेल्या ठरावावर संबंधित कार्यालयाला कोणत्याच प्रकारचे पत्र दिल्या जात नाहीत हे ठराव जसेच्या तसेच धूळखात पडून राहतात व लोकांची खरेदीखते नोंदणी जसेच्या तसेच पडून राहत असलेले आढळत आहेत असाच प्रकार सूनगाव येथील अनिल पांडुरंग हागे व विजय पांडुरंग हागे यांनी आपल्या वडिलांच्या नावे असलेल्या जागेची दोन्ही भावाच्या नावे खरेदी खता द्वारे वाटणी केली होती व त्यानुसार खरेदी खताचे दस्तऐवज ग्रामपंचायतला 8 /1 /2021 रोजी दिलेली आहे व त्यानुसार ग्रामपंचायतीने त्यांना खरेदी खत नोंदी ची चारशे रुपयाची पावती सुद्धा दिलेली आहे परंतु सुनगाव ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले लिपिक गजानन धुळे कर्मचारी मासिक सभेमध्ये झालेले ठराव व खरेदी नोंदी व लोकांची कागदपत्राची कामे वेळेवर न करता तसेच पडून राहत आहेत जसे की अनिल हागे यांचे खरेदीखत बाबत नोंद ही दहा महिन्यापासून जशीच्या तशीच पडून आहे या लिपिकाच्या हलगर्जी पणामुळे सर्व सामान्य लोकांना त्रास होत आहे मासिक सभेत झालेले ठराव व असलेल्या नोंदी ह्या वेळेवर तयार करून त्याचे उतारे तयार करून त्यावर सरपंच व ग्रामसेवक यांच्या सही घेण्याचे काम हे लिपिकाचे आहे परंतु लिपिक हा कोणालाही न जुमानता हे ठराव जसेच्या तसे पडून ठेवत आहे तरी या लिपिकाच्या मनमानी कारभारा मुळे सूनगाव येथील नागरिकांना बराच त्रास होत आहे तरी सरपंच व ग्रामसेवक व वरिष्ठ पंचायत समिती अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत