शहरातील भुगटारीचे काम पूर्ण झाले. खोदलेल्या रस्ताचे दुरुस्तीचे काम ही त्वरित पूर्ण करा. स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा.
शेगाव प्रतिनिधी – शेगाव शहरामध्ये जीवन प्रादीकारण मार्फत (M.J.P) भुयारी गटारीचे काम सुरु होते.
ते काम आता पूर्ण होऊन बरेच महिने लोटले आहे. भुयारी गटारीचे काम करीत अस्तानां खूप खोलवर रस्ता खोदावा लागत असल्या मुळे. जुना डाबरी रस्ता हा पूर्णत खराब होऊन कच्चा रस्त्या समान होतो.
शेगाव शहरातील विविध ठिकाणी भुयारी गटारीचे काम चालु होते. या भुयारी गटारी मुळे शेगाव शहरातील नागरिकांना फायदाच झाला आहे. त्यात काही शंका नाही परंतु डाबरी रस्त्या खोदल्या मुळे शहरत विविध ठिकाणी कच्चा रोड तयार झाला आहे.
M.J.P मार्फत भुयारी गटारीचे जे काम शेगाव शहरात करण्यात आले आहे. त्या कामाचे जीवन प्रदिकारण नगर परिषदेने काम पूर्ण केल्या नंतर पूर्ण पैसे (मोबदला) अदा करते. तरी सुद्धा नगर परिषद कळून M.J.P. ने खोदुन बुजून ठेवलेल्या रस्ताचे दुरुस्तीचे काम अदयाप पर्यंत केले नाही.
त्या मुळे शहरातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. आता तर मान्सून ची चाहुल लागली आहे. पावसाळा काही महिन्या वर्ती येऊन ठेपला आहे.
रस्त्याचे डाबरी कारण न झाल्याने रस्त्याला कच्चा रस्त्याचेस्वरूप प्राप्त झाले आहे. नगरपरिषदे कळून रस्त्याचे काम करण्याकरिता होत असलेल्या दिरंगाई मुळे या रस्त्यावरती छोटे मोठे अपघात होत असतात. शेगाव शहरातील भुयारी गटारीचे काम झालेने आहे आता त्वरित रस्त्याचे डाबरी कारन करावे अन्यथा नगर परीषद शेगाव हया आपल्या कार्यलया वर्ती स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात येईल याची आपण नोद घ्यावी अश्या तरेचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या कळून देण्यात आले.