माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सुनगाव मध्ये कृषी संजीवनी अंतर्गत कृषी विभागाचे मार्गदर्शन
गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी – तालुक्यातील सुनगाव येथे दिनांक एक जुलै रोजी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 21 जून ते एक जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या कृषी सप्ताहादरम्यान कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असत यामध्ये शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया चे महत्व शेतकऱ्यांना बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करण्याचे आवाहन कपाशी बाबत एक गाव एक वाण संकल्पना तसेच शेतकऱ्यांना खतांविषयी मार्गदर्शन रासायनिक खतांचे दुष्परिणाम रासायनिक खते का टाळावीत या विषयी मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध शेतीविषयक योजनांची माहिती या सर्वांबद्दल शेतकऱ्यांना कृषी संजीवनी सप्ताहामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
दिनांक एक जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सुनगाव येथील शेतकरी तथा पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे यांच्या जामोद रोडवरील मळ्यामध्ये माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन तसेच कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी हरभरा पिकाचे भरघोस उत्पन्न घेणाऱ्या तीन शेतकऱ्यांचा सन्मान पत्र देउन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनगाव चे सरपंच रामेश्वर अंबडकार होते. यावेळी पंचायत समिती सभापती रामेश्वर राऊत उपसभापती महादेवराव धुर्डे, बांधकाम सभापती राजेंद्र उमाळे, गुणवंतराव कपले माजी पंचायत समिती सदस्य अशोक काळपांडे, तालुका कृषी अधिकारी वाकोडे, विस्तार अधिकारी नावकार,विषयतज्ञ उमाळे, विषयतज्ञ दाते, विस्ताराधिकारी बाहेकर, ग्रामसेवक चौधरी, मंडळ कृषी अधिकारी गाडे मॅडम, कृषी सहाय्यक शिनगारे मॅडम, कृषी सहाय्यक शेकोकार, कृषी सहाय्यक सावदेकर,कृषी पर्यवेक्षक भवर, कृषी पर्यवेक्षक बंड, राऊत, कृषी सहाय्यक राठोड,अशोक पाटील,राजु झंवर,सागर राठी,मनु भगत, रवि धुळे, मंगेश धुर्डे, गणेश धुर्डे, रमेश सातपुते,उमेश कुरवाडे, ग्रामपंचायत कर्मचारी सागर उमाळे,गुणवंत धर्मे, यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.