बुलडाणा दि. 11 : भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार दिनांक नोव्हेंबर 2021 रोजी मतदान केंद्रावर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सदर प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करून घ्यावी.
प्रारूप मतदार यादीमध्ये ज्या मतदारांची नावे आढळून आलेली नाही तसेच दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी ज्या मतदाराचे वय 18 वर्ष पूर्ण होईल अशा मतदारांनी दिनांक 1 नोव्हेंबी ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस रामामूर्ती व उपजिल्हा निवडणूक अधिकारी भूषण अहीरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.