Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

वाळूची चोरी करताना टिप्पर पकडले,
विशेष नाका बंदी पथकाची चिखलीत कारवाई
चोरीचा गुन्हा दाखल

Walu

वृत्त संकलन चिखली.
अवैध पणे रेती उपसा करून विकण्याच्या धंद्याला तेजी आली असतानाच महसूल प्रशासनाने विना रॉयल्टी रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परा वर कारवाईचा सपाटा लावला असतानाच 26 डिसेंबरच्या रात्री दोन वाजून तीस मिनिटांनी चिखली शहरातील पानगोळे हॉस्पिटल समोर पोलिसांच्या विशेष नाकाबंदी पथकाने रेती टिप्पर पकडून त्याच्याविरुद्ध वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे
खडकपूर्णा नदी पात्रातून विनापरवाना रेती उपसा करून तीन हजार रुपयांमध्ये चार ब्रास रेती चे टिप्पर भरून घेऊन गरजू लोकांना बाजारामध्ये पंधरा ते वीस हजार रुपये पर्यंत विकण्याच्या प्रचंड नफ्याच्या धंद्यामध्ये प्रचंड तेजी असताना एकीकडे शासनाच्या रेती घाटाची हराशी झालेली नसताना विनापरवाना दिग्रस तसेच ईसरुळ महसूल शिवारातून शासनाचा महसूल बुडून काही अधिकाऱ्यांच्या गल्ली भरून धंदा करणाऱ्या रेती व्यवसायिकांवर महसूल प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी करडी नजर ठेवली आहे तरीही महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना न जुमाननारे काही रेती व्यवसायिक आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

26 डिसेंबरच्या रात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान पाच ते सहा रेती टिप्पर देऊळगाव मही कडून चिखली कडे येत असल्याच्या माहितीवरून पोलीसांचे विशेष नाकाबंदी पथक बुलढाणा यांनी पाठलाग करून त्यातील एक टिप्पर पकडले इतर टिप्पर मात्र फरार झाले चिखली शहरातील पानगोळे हॉस्पिटल समोर सदर टिप्पर समोर पोलिस वाहन लावल्यानंतर टिप्पर थांबले व पंच समक्ष चौकशी केली असता सदर रेती ही चोरीची असल्याचे मिळून आल्याने त्याविरुद्ध नायब पोलीस कॉन्स्टेबल एसडीपीओ ऑफिस चिखली सुनील बोनाडे यांच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांत आरोपी रेती टिप्पर क्रमांक एम एच 28 बी बी २००३ विरुद्ध अ पण क्रमांक ८४६/ 2021 कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करून चार ब्रास रेती अंदाजे किंमत 12000 व टिप्पर दहा लाख रुपये असा दहा लाख 12 हजाराचा ऐवज जप्त केल्याची नोंद चिखली पोलीस स्टेशनला घेण्यात आली आहे पुढील तपास अशोक गाढवे करीत आहेत

पोलीस व महसूल प्रशासनाची संयुक्त कारवाई व्हावी

वाळूची चोरी अशा आशाया खाली पोलीस अवैध रेती वाहतूक करणार्‍या वाहतूकदार विरुद्ध गुन्हा दाखल करतात मात्र या मध्ये अधिक काही दंडात्मक कारवाई होत नाही व न्यायालयातून वाहनाची सुटका होते परंतु हीच कारवाई जर महसूल प्रशासनाकडून झाली तर चार ब्रास टीप्पर पडले तर तीन ते सव्वा तीन लाख रुपये दंड पडतो त्यामुळे रेती चालक महसूल विभागाच्या कारवाईला भितात मात्र जुमानत नाहीत म्हणून महसूल व पोलीस प्रशासनाने अवैध रेती वाहतूकी विरुद्ध संयुक्त कारवाई करायला हवी तेव्हा त्याला चाप बसेल व शासनाच्या महसुलात वाढ होण्यास मदत होईल पोलिसांनी कारवाई केल्यानंतर सुद्धा गौण खनिज उत्खननाचा विषय असल्याने न्यायालयात प्रकरण जाण्यापूर्वी पोलिसांनी महसूल विभागाचे सल्ला अथवा से मागविणे गरजेचे आहे यासाठी दोन्ही विभागाच्या संयुक्त पथकाकडूनच कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.