Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

आई स्केटिंग अकँडमी च्या खेळाडूंचा इंटरनँशनल बुक आँफ रेकॉर्ड मध्ये सहभाग

रवींद्र सुरुशे चिखली – दि.27 जुन रोजी आई स्केटिंग अकँडमी च्या खेळाडूंनी रेकॉर्ड मध्ये सहभाग नोंदवला या रेकॉर्ड मुळे खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याचा व आपले नाव रेकॉर्ड मध्ये नोंदविण्याची संधी मिळाली त्यामुळे खेळाडूंनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. यामध्ये खेळाडू यशराज अय्या, प्रणव भालेकर,गित सावजी,मयन ठेंग,नैतिक ठेंग, वंशता अय्या क्रुष्णा सावजी,रेहान खान,धारा वाधवानी,ओवी जोशी,साईदिप हरगुणानी, सार्थक हरगुणानी, काव्या भुतेकर,राहुल सातव,श्लोक गावंडे,सर्वेश वायाळ,शर्वरी कस्तुरे, पुर्वा भाकडे,देवांशु क्षीरसागर, खुशी देशमाने, अर्जुन लोखंडे,या खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

aai sceting


हे रेकॉर्ड आई स्केटिंग अकँडमी च्या खेळाडूंनी चिखली येथील स्केटिंग ग्राउंड जयस्वाल मंगल कार्यालय शेलुद येथे पुर्ण केले. स्पर्धेला रोलर बास्केटबॉल असोसिएशन चे अध्यक्ष श्री. गजुभाऊ तारू उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडली.प्रमुख पाहुणे सुनील गावंडे, श्री. माधव मंडळकर सचिव रोलबाँल असो.बुलढाणा आई स्केटिंग अकँडमी चे संचालक देवानंद नेमाने, घेर सर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. जयस्वाल सर संचालक जयस्वाल मंगल कार्यालय विजय पळसकर ,उपाध्यक्ष रोलर बास्केटबॉल असो.भूषण मंडळकर शंतनू महाजन, व आदरणीय पालक यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या उपस्थित खेळाडूंनी रेकॉर्ड पुर्ण केले.या खेळाडूंना आई स्केटिंग अकँडमी चे प्रशिक्षक देवानंद नेमाने यांचे मार्गदर्शन मिळाले.खेळाडूंनी आपल्या यशाचे सर्व श्रेय आपले आई वडील व प्रशिक्षक यांना दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.