Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या ६ व्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन

डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे सहभाग घेण्याचे जाहीर आवाहन

स्वतंत्र भारताचे ११ वे राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या दि. २७ जुलै २०२१ रोजी साजऱ्या होणाऱ्या ६ व्या स्मृती दिनानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध स्पर्धांचे राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन पद्धतीने विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्याने डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे जास्तीत जास्त संख्येने सक्रिय सहभाग घेण्याचे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

ABDUL KALAM
 डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस झोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मार्टिन ग्रुपच्या सहकार्याने आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१ प्रकल्पात दि. ७ फेब्रुवारी २०२१ रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथून भारतातील १००० बाल वैज्ञानिकांनी एकाच वेळी पूर्णपणे भारतीय बनावटीचे १०० लघु उपग्रह (पेलोड क्यूब्ज) बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात सोडून एकाच वेळी गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, अशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड आदी ५ जागतिक विक्रमांवर नाव कोरून नवा किर्तीमान स्थापित केला. यात महाराष्ट्रातील तब्बल ३९८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून सिंहाचा वाटा उचलला होता हे विशेष.

 वरील विक्रम प्रस्थापित करणाऱ्या कलाम कुटुंबियांद्वारा रामेश्वरम् स्थित 'हाऊस ऑफ कलाम' येथून चालवल्या जाणाऱ्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे आयोजित कलाम साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त मागील वर्षी ३५००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यावर्षीही तितक्याच उत्साहाने ६ व्या स्मृती दिनाच्या स्मरणार्थ क्विज, रेखांकन, वक्तृत्व, इनोव्हेशन चॅलेंज डिझाईन कॉन्टेस्ट २०२१, डिजिटल निबंध लेखन आदी विविध स्पर्धांचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक देण्यात येईल. तसेच प्रत्येक स्पर्धेमध्ये कमीत कमी २५ विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविणाऱ्या शाळा, विद्यालयास फाउंडेशनतर्फे स्वतंत्र प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. सहभाग नोंदविण्यासाठी फाउंडेशनच्या http://apjabdulkalamfoundation.org/6th-year-remembarance-day/competition-2021 या संकेतस्थळाचा आधार घ्यावा. अधिक माहितीसाठी  ९४८६६६१९३१, ९६७७६४१३५१, ७४१८१३४३६५ व  ०४५७३२२१९३१ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच contact@houseofkalam.org व Office@apjabdulkalamfoundation.org या ई-मेलचा वापर करावा.

            🎤 वक्तृत्व स्पर्धा 🎤

Dr. APJ Abdul Kalam’s Vision Beyond 2020 हा वक्तृत्व स्पर्धेचा विषय असून इ. ६ वी ते १२ वी चे विद्यार्थी हिंदी किंवा इंग्रजी भाषेत सादरीकरण करू शकतात. यासाठी नाव नोंदणी व भाषण पाठवण्याची शेवटची तारीख १५ जुलै आहे. यात प्रत्येक गटातील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके आणि प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास कलाम कुटुंबियांच्या स्वाक्षरीचे सहभाग प्रशस्तीपत्र देण्यात येईल. नाव नोंदणी साठी http://www.apjabdulkalamfoundation.org/6th-year-remembarance-day/registerform?name=Elocution या दुव्याचा वापर करावा.

🎲 ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा 🎲

मुलांमध्ये राष्ट्रीय एकात्मता वाढवणे आणि त्यांना डॉ. कलाम साहेब व त्यांचे देशाप्रती योगदान इत्यादी बाबतीत जागरूक करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. यात इ. २ री ते डिप्लोमा, पदवीधर, इंजिनिअरिंग असे विविध गट असून नाव नोंदणीची शेवटची तारीख २६ जुलै २०२१ आहे. नाव नोंदणीसाठी http://www.apjabdulkalamfoundation.org/6th-year-remembarance-day/registerform?name=quiz या दुव्याचा वापर करावा.

 ह्या केवळ स्पर्धा नसून संकट काळात प्रत्येक भारतीयांच्या उत्थानासाठी प्रदान करण्यात येणाऱ्या मानवतावादी मदतीचा भाग होण्यासाठी निश्चितच प्रोत्साहित करणारा उपक्रम ठरेल. डॉ. कलाम साहेबांची विद्यार्थ्यांशी खूप जवळीकता होती. वरील उपक्रमातील विविध स्पर्धांमध्ये आपणा सर्वांचा सक्रिय सहभाग हीच कलाम साहेबांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे *कोअर कमिटी में, विभागीय समन्वयक , जिल्हा समन्वयक  तालुका समन्वयक * यांनी जाहीर आवाहन केले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.