Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

चालकाचा ताबा सुटल्यामुळे उभ्या असलेल्या आयशर ट्रक वर कार आदळल्याने एक जखमी.

Accident

मेहकर प्रतिनिधी रवींद्र सुरूशे – औरंगाबाद नागपूर महामार्गावरील डोनगाव येथे श्री शिवाजी हायस्कूल समोर डोणगाव वरून मेहकर कडे जात असणारा आयशर ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे रोडवर उभा होता. व जवळच गतिरोधक असल्यामुळे इंडिका कार चालकाचा ताबा सुटल्याने कार पाठीमागून ट्रकला धडकली. या अपघातामध्ये डोणगाव येथील रहिवाशी राजकुमार सारडा हे गंभीर जखमी झाले असून त्यांना मेहकर येथे वैद्यकीय उपचारा सुरू आहे. ही घटना आज 14 जूनला सोमवारी सकाळी चार वाजेच्या दरम्यान घडली अशी माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच डोणगाव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास डोणगाव पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.