Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

स्मशानभूमीत मृतदेहाची अवहेलना टाळण्यासाठी दहनजाळी लावावी – अँड संदीप मेहेत्रे

adv sandip mehetre

अँड संदीप मेहेत्रे – सिंदखेडराजा येथील हिंदू स्मशानभूमीत मृतदेहाच्या अंतीमसंस्कर करीता दहनशेड जाळी नसल्यामुळे लाकडाचा वापर जास्त प्रमाणात करावा लागतो व नंतर मृतदेहाची अवहेलना पण होते या प्रश्नाकडे लक्ष वेधून दहनशेड मध्ये दहनजाळी लावण्यात यावी, दहनजाळी लावल्याने मृतदेहाची अवहेलना टळेल, व लाकडाचा (जळतन) वापर कमी होईल. यासाठी आज नगर परिषद मुख्याधिकारी याना अँड.संदिप मेहेत्रे, संजय मेहेत्रे, रवी ढवळे, शिवा ठाकरे यांनी निवेदन दिले. व त्यासोबतच हिंदु स्मशानभूमीतील हायमस्थ लाईट ची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. अँड संदीप मेहेत्रे हे आपल्या वेगवेगळ्या आंदोलनाने अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करतात व आज त्यांनीं केलेली मागणी ही गरजेची आहे व योग्य मागणी आहे अशी सर्वत्र चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.