Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

आकाशवाणीच्यावतीने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

बुलडाणा,दि. 18 : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने आकाशवाणी, मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्य संग्रामातील महत्वाच्या बाबींविषयी समाजात औत्स्युक्य निर्माण व्हावे, ऐतिहासिक स्मृतींना उजाळा मिळावा आणि समाज मनात त्याचे स्थान कायम रहावे, या उद्देशाने ज्ञान प्रबोधनासाठी ही स्पर्धा 16 ऑगस्टपासून आयोजित करण्यात आली आहे.

All India Radio

    या स्पर्धेसाठी आकाशवाणीच्या बातमीपत्रातून दर सोमवारी एक प्रश्न विचारल्या जाणार आहे. स्पर्धकांनी या प्रश्नाचे उत्तर आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडे quiz75news@gmail.com या ई मेल द्वारे पाठवायचे आहे. सर्वप्रथम योग्य उत्तर देणाऱ्या यशस्वी स्पर्धकाचे नाव शुक्रवारच्या बातमीपत्रातून प्रसारीत करण्यात येणार आहे. आकाशवाणीच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरही फोटोसह विजेत्या स्पर्धकाचे नाव प्रकाशित करण्यात येईल. तसेच प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आकाशवाणी, मुंबईच्या वृत्त विभागप्रमुख सरस्वती कुवळेकर यांनी केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.