Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अमोना गावचे सुपुत्र, “द मिरर मॅन” पुरस्काराने सन्मानीत*
इसरुळ प्रतिनिधी


  समाजामध्ये राहत असतांना आपण जर समाज उपयोगी कामे केली तर त्या कामाची दखल कोन्ही ना कोन्हीतरी घेत असते. अशीच दखल पुण्यामध्ये, चिखली तालुक्यातील अमोना या छोट्याशा गावातील राणा अशोक दगडु इंगळे यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून “द मिरर मॅन” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
     बुलडाणा जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या अशोकभाऊ इंगळे यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र त्यांच्या बालपणातच हरविले व ते घरातील कर्ता-पुरुष असल्यामुळे त्यांनी आपल्या वरती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी  गाव सोडून पिंपरी चिंचवड या उद्योग नगरीत प्रस्थान केले. ते तिथे गेल्या नंतर त्यांनी आपल्या प्रचंड ईच्छा शक्तीच्या जोरावर आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून अल्पावधीतच एक यशस्वी उद्योजक म्हणून आपली ओळख निर्माण केली. आपला व्यवसाय चालू असतानाच आपण समाजाचे काही तरी देने लागतो या उद्देशाने प्रेरित होऊन त्यांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेना व राजपूत समाज संघटन पिंपरी चिंचवड शहर या संघटनेच्या सोबत राहून समाजातील तळागाळातील व्यक्ती पर्यंत पोहोचण्यासाठी समाज उपयोगी रक्तदान शिबिर,आरोग्य शिबीर,महिलांसाठी मेहंदी,पाक कला,रांगोळी, हस्तकला या सारख्या अनेक उपक्रमांचे आयोजन करून समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलला.
        त्यांच्या याच कामाची दाखल घेऊन पिंपरी चिंचवड तसेच पुणे जिल्ह्यातील निर्भीड पत्रकारिते साठी प्रसिध्द असणाऱ्या “आपला आवाज न्यूज चॅनेल” ने त्यांना आंतराष्ट्रीय पुरुष दिना निमित्त द मिरर मॅन हा महाराष्ट्रातील प्रथम पुरस्कार पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त आयर्न मॅन कृष्णप्रकाश , पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेशजी पाटील,विश्वासराव आरोटे जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
मी माझ्या सामाजिक जीवनात जे काही काम करू शकलो त्यासाठी मी माझ्या जन्मभूमी तील व कर्मभूमी तील माझ्या सर्व आप्तेष्ट, सहकारी मित्र,मार्गदर्शक,संघटनेचे सर्व जेष्ठ मंडळी यांचे आभार मानतो. अशा भावना राणा अशोकभाऊ इंगळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या.

Amona
Leave A Reply

Your email address will not be published.