Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनांचे बँकांना उद्दिष्ट वाटप

बुलडाणा, दि. 24 :  अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनातंर्गत आर्थिक वर्ष 2021-22 वर्षाकरीता बँकांना लक्षांक प्राप्त झाला आहे. सदर लक्षांक 1500 प्रकरणांचा असून बँकांना शाखानिहाय देण्यात आला आहे. देण्यात आलेला लक्षांक हा कमीत कमी कर्ज प्रकरणांचा आहे. महामंडळाच्या योजनातंर्गत पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना कोणत्याही बँकेच्या शाखेकडून देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज परतावा करण्यासाठी महामंडळ तत्पर आहे. मात्र बँकांनी कोणत्याही लाभार्थ्याला बँकेमार्फत लक्षांक नाही किंवा लक्षांक संपुष्टात आला आहे, असे कारणे देवून कर्ज देण्यापासून वंचित ठेवू नये, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांनी कळविले आहे.

महामंडळाचे बँक निहाय कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट

अलाहाबाद बँक : 8 कर्ज प्रकरणे, आंध्रा बँक : 8, बँक ऑफ बडोदा: 1, बँक ऑफ इंडिया : 14, बँक ऑफ महाराष्ट्र : 148, कॅनरा बँक : 30, सेंट्रल बँक ऑफ इंडिया : 100, देना बँक : 5, आयडीबीआय बँक : 50, इंडियन ओव्हरसिस बँक : 20, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स : 10, पंजाब नॅशनल बँक : 10, स्टेट बँक ऑफ इंडिया : 300, सिंडीकेट बँक ऑफ इंडिया : 8, युको बँक : 8, युनीयन बँक ऑफ इंडिया : 30, विदर्भ कोकण ग्रामीण बँक : 100, एक्सिस बँक : 50, एचडीएफसी बँक : 50, आयसीआयसीआय बँक : 50, बीडीसीसी बँक : 100, अनुराधा चिखली को- ऑप बँक : 100, द चिखली अर्बन को- ऑप बँक : 300.  अशाप्रकारे 1500 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.