Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आ.रायमुलकर यांनी केली पाहणी.

SANJAY RAYMULKAR

मेहकर रवींद्र सुरूशे. – 28 जूनला झालेल्या पावसामुळे मेहकर तालुक्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेले आहे. या नुकसानीचे पाहणे आज दिनांक 30 जून बुधवार ला लोणी गवळी व परिसरातील शेतजमिनीची पाहणी अधिकाऱ्यांसमवेत या भागाची पाहणी शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांनी केली. व शेतकऱ्यांना धीर देत सरकार तुमच्यासोबत आहे मी व खासदार साहेब मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच सोबत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांचे जमिनीचा सर्वे करून यादी तयार करावी. व ही यादी फायनल करण्याअगोदर संबंधित गावांच्या ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर लावा. म्हणजे कोणताही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना यावेळी रायमुलकर यांनी दिल्या. गटविकास अधिकारी पवार,कृषी अधिकारी काळे, तलाठी मॅडम, कृषीसाह्यक सोळंकी, कृषीसाह्यक मोरे, सरपंच दिनुभाऊ कंकाळ, ग्रामसेवक बंगाळे,काळे,गजानन लहाने,तंटामुक्ती अध्यक्ष श्री दिनुभाऊ लहाने, मा सभापती बबनराव लहाने, कॉटन मार्केट बाजार समितीचे संचालक संजय सवडतकर व अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते.

1 Comment
 1. भरत लक्ष्मणराव सुरसे says

  मा. आमदार संजयजी रायमुलकरसाहेब ,
  आपण संकटगूरस्त शेतक-याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना शासनाकडून तातडीने *नुकसान भरपाई*कशी मिळेल याबाबत प्रत्यक्ष आपण शेतक-यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून शासनाचे प्रितिनिधी म्हणून जे काम करीत आहात त्याबाबत आपलं मनापासून *अभिनंदन* .
  साहेब ,पण आपल्याच देऊळगावमाळी येथील 14 शेतक-यांच्या *एकांबा लघुपाबंधारे प्रकल्पात कॅनालखाली जमिनी गेल्यात. त्यांना 25 सप्टेंबर 2013 साली वाढीव दराने कोर्टामार्फत पैसे द्यावेत असा शासननिर्णय झाला पण जुलै 2021 उजाडले आहे पण अजून त्या शेतक-याना **पाटबंधारे विभाग बुलढाणा** यांच्याकडून अद्याप पैसे मिळायला कोणता मुहूर्त बघणार आहेत .यात या झारीतील शुक्राचा-याकडून शासनाचेच नुकसान होते आहे .हे कृषीम॔त्रीमहोदयांच्या लक्षात येऊ नये का ? शेतक-याचे कोर्टाने मंजूर करून दिलेल्या आदेशाचे पालन शासनाकडून का होत नाही ?. ढा शेतक-यांना पैसा देण्यास हा विभाग जेवढा वेळ लावेल दिरंगाई, हलगर्जीपणा करेल तेवढे जास्त व्याजरूपात शासनालाच अधिक भूर्दंड पडणार आहे शिवाय संबधित शेतक-यांची कुचंबना कशासाठी?
  मा. आमदार महोदय कृपया आपण याही प्रकरणात लक्ष घालून या झारीतल्या शुक्राचा-याना शोधून शेतक-यांना 20वर्षांच्या लढाल्या यश मिळवून देण्याचा प्रयत्न करावा ही या प्रकरणातील सर्व शेतक-याचंच्यावतीने नम्र विनंती आहे .
  या प्रकरणातील ग्रस्त शेतकरी – भरत लक्ष्मणराव सुरसे, देऊळगावमाळी

Leave A Reply

Your email address will not be published.