किनगावराजा (प्रतिनिधी सचिन मांटे). – किनगावराजा हद्दीत चोरटयांनी विदेशी दारूचे फोडले .किनगावराजा येते विनोद वाईन बार व रेस्टॉरंट चे मालक विनोद रमेश हरकळ यांनी पोलीस स्टेशन किनगावराजा येथे तोंडी तक्रारनुसार अज्ञात आरोपीने किनगावराजा येथील विनोद वाइन बार व रेस्टॉरंट चोरटयांनी दि.१ जून च्या सकाळी अंदाजे ३ ते ३:३० वाजता बार व रेस्टॉरंट अज्ञात चोरटयांनी फोडले व दुकानात विविध कंपनीच्या विदेशी दारूचा माल अंदाजे, ६८,१७९/- रुपयेचा माल चोरटयांनी लंपास केला .
किनगावराजा हद्दीत याअगोदर प्रतीक वाइन बार चोरटयांनी फोडला होता त्यातच आता विनोद वाइन बार चोरटयांनी फोडला एकाच हप्त्यात किनगावराजा पोलीस स्टेशन च्या हद्दीतील दुसरी घटना आहे . या चोरीचा लवकरात लवकर छडा लावून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या जातील असे किनगावराजा पोलीस स्टेशन कडून कळविण्यात आले. तसेच सदर घटनाचा तपास किनगावराजा पोलीस स्टेशन चे ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमदार राजू दराडे ,जाकीर पठाण ,रोशन परसूवाले,गजानन सानप, पवार,हे करत आहे. किनगावराजा ची दारू आवडे चोरट्यांना अशी काहीशी परिस्थिती या दोन घटनांमुळे झाल्याची चर्चा आहे .