Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

नांद्राकोळी येथील सोयाबीन शेतीला निविष्ठा व गुणनियंत्रक संचालकांची भेट

बुलडाणा दि.30 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत मौजे नांद्राकोळी तालुक्यातील सुभाष बाबुराव राऊत यांचे शेतावर संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी 27 जुन 2021 रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी शेडनेटची पाहणी व चर्चा केली. त्यामध्ये लागवड करण्यात आलेल्या पिकॅडोर मिरची संदर्भत लागवड तंत्र, खत, एकात्मिक किड व्यवस्थापन, काढणी व्यवस्थापन, विक्री व्यवस्था या संदर्भात चर्चा व मार्गदर्शन केले.

     तसेच सोयाबीन पेरलेल्या शेतामध्ये भेट देवून सोयाबीन वाण एम ए यु एस 158 ची पाहणी केली. यावेळी उगवलेले सोयाबीन बिजांकुर हे निळ्या रंगाचे आढळून आले. या विषयी शेतकऱ्यांशी चर्चेअंती  घरच्या सोयाबीन बियाण्याला कार्बनडेन्झीम व मॅन्कोझेब बुरशीनाशकाची बिज प्रक्रिया केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गावामध्ये कृषी विभागाने घरचे बियाणे वापरणे, उगवण क्षमता चाचणी घेणे व बिज प्रक्रिया मोहीम राबवून त्याचे महत्व शेतकऱ्यांना पटल्यामुळे गावातील जवळपास 90 टक्के शेतकऱ्यांनी बिज प्रक्रिया करुन सोयाबीन बियाणे पेरणी केल्याचे शेतकरी सुभाष बाबुराव राऊत यांनी सांगितले.

beej

  बिज प्रक्रिया मोहीम यशस्वी केल्याबद्दल संचालक यांनी शेतकऱ्यांचे व कृषी सहाय्यक यांचे कौतुक केले. बुलडाणा उप विभागामध्ये बिजप्रक्रियेची 2411 प्रात्यक्षीके राबविली असून त्यामध्ये 17000 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त सहभाग दिसून आला. सदर भेटीच्या वेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे, कृषी विकास अधिकारी अनिसा महाबळे, कृषी पर्यवेक्षक आर. जि. देशमुख, आर. टी. पवार, उपसरपंच मनोज जाधव, ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्य कृषी सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे गावातील

इतर शेतकरी उपस्थित होते, असे उपविभागीय कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.